विकेंडला नेहमीच बाहेरचं खाण्याची इच्छा होते. नेहमी नेहमी बाहेरचं खाल्ल्यानं तब्येत खराब होण्याचाही धोका असतो. ( Khaman Dhokla Recipe) नाश्त्याला पोहे, उपमा, इडली खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन पदार्थ ट्राय करायला हवेत असं वाटतं. तुम्हालाही बाहेरचं खाण्याच्या क्रेव्हींग्स येत असतील तर घरच्याघरी साधा, सोपा नाश्ता म्हणून तुम्ही ढोकळा खाऊ शकता. (How to make soft spongy dhokla)
मुलांना डब्यात देण्यासाठी, पाहूणे आल्यानंतर त्यांच्या प्लेटमध्ये ठेवण्यासाठी किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यातील ढोकळा हा उत्तम ऑपश्न आहे. ढोकळ्यात कमीत कमी कॅलरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर नाश्त्याला ढोकळा खाऊ शकता. (Instant Khaman Dhokla with Tricks for Soft,Spongy)
ढोकळा कसा बनवायचा? (How to make Dhokla)
साहित्य
अधी वाटी - डाळ
अर्धी वाटी- तांदूळ
१ वाटी- दही
चवीनुसार- मीठ
अर्धा टिस्पून- हळद
फोडणीसाठी -
२ टिस्पून - तेल
१ टिस्पून - मोहोरी
१० ते १५- कढीपत्ता पानं
१ टिस्पून - साखर
१ कप - पाणी
कृती
- सगळ्यात अर्धी वाटी डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ 5 ते 6 तासांसाठी भिजवून ठेवा. डाळ तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर एका भांड्यात डाळ, तांदूळ आणि दही, पाणी एकत्र करा. दळून झाल्यानंतर हे मिश्रण एका बाऊल मध्ये ठेवा. नंतर त्यात मीठ आणि हळद घालून एकत्र करा. एका भांड्याला तेल, तूप लावून घ्या आणि त्यात हे डाळ -तांदळाचं मिश्रण घालून वाफवण्यासाठी ठेवा.
ना मशिन, ना कन्डेंस मिल्क; घरीच फक्त दूध वापरून करा क्रिमी, थंडगार आईस्क्रीम; घ्या रेसिपी
- ५ ते १० मिनिटं ढोकळ्याचं मिश्रण वाफवल्यानंतर चमचा किंवा स्टिकच्या साहाय्यानं चेक करा. मिश्रण चिकटलं नाही की समजा ढोकळा तयार आहे. तेलात मोहोरी, कढीपत्ता, मिरची घालून फोडणी तयार करा. कढीपत्ता तडतडल्यानंतर त्यात पाणी घाला आणि एक चमचा साखर घाला. साखर वितळ्यानंतर हे पाणी ढोकळ्यावर घाला. तयार आहे गरमागरम ढोकळा