Join us  

उपमा करताना रव्याच्या गुठळ्या होतात? १ भन्नाट ट्रिक; नाश्ता सेंटरला मिळतो तसा उपमा होईल भन्नाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2024 5:11 PM

How to make soft upma /Restaurant style fluffy upma : चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे योग्य प्रमाण किती असावे?

महाराष्ट्रीयन घरांमध्ये सकाळच्या नाश्त्याला विविध पदार्थ केले जातात (Upma Recipe). कुणी भाजी - पोळी, पोहे तर कुणी उपमाची फर्माइश करतात. तर काहींना नाश्त्याला साऊथ इंडिअन पदार्थ खायला आवडतात (Food). अनेकांची पसंती उपमाकडे वळते. ज्याला काही जण उपीट देखील म्हणतात (Cooking Tips). उपमा रव्याचा केला जातो. पण घरात उपमा तयार केल्यास मनासारखा होत नाही.

कधी रव्याचे गुठळ्या तयार होतात. तर काही वेळेस उपमाची चव बिघडते. नाश्ता सेंटरला मिळतो, तसा उपमा घरात तयार होत नाही. जर आपल्या देखील घरात उपमा मनासारखा मऊ, चवीला भन्नाट असा होत नसेल तर, या रेसिपीला फॉलो करा. पाणी आणि रव्याचे प्रमाण जाणून घ्या. मनासारखा भन्नाट उपमा नक्कीच तयार होईल(How to make soft upma /Restaurant style fluffy upma).

लागणारं साहित्य

कांदा

हिरवी मिरची

रवा

तेल

जिरं

मोहरी

शेंगदाणे

काजू

नवीन चपला चावतात, फोड येतात-चालणं मुश्किल? ४ घरगुती उपाय- नव्या चपला घाला बिंधास्त

कडीपत्ता

लाल सुक्या मिरच्या

आलं

उडीद डाळ

मूग डाळ

पाणी

मीठ

साखर

कोथिंबीर

कृती

सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप रवा घालून भाजून घ्या. रवा भाजून घेताना त्यात एक चमचा तूप घाला. रव्याचा रंग सोनेरी झाल्यानंतर एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर कढईमध्ये ३ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक कप शेंगदाणे आणि काजू घालून भाजून घ्या. भाजून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.

पावसाळ्यात शिळं अन्न खाताय? किती तासांनी पदार्थ खाल्ले तर फूड पॉयझनिंगचा धोका, आजारांना आमंत्रण

त्याच तेलात एक चमचा मोहरी, जिरं, एक चमचा मूग डाळ, अर्धा चमचा हिंग, बारीक चिरलेला कांदा, कडीपत्ता, २ लाल सुक्या मिरच्या, बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं आणि १ चमचा उडीद डाळ घालून भाजून घ्या. कांद्याचा रंग लालसर झाल्यानंतर त्यात ३ कप गरम पाणी ओता. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्यात भाजलेला रवा घालून मिक्स करा. शेवटी एक चमचा साखर घाला, व त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. वाफेवर उपमा शिजवून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे आपला नाश्ता सेंटरला मिळतो तसा मऊ चमचमीत उपमा खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स