Join us

महिनाभर टिकेल खमंग सोलापूरी शेंगदाणा चटणी; भात-भाकरीसोबत खा, पाहा सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2025 12:28 IST

Solapur Peanut Chutney Recipe: How to Make Shengdana Chutney Spicy: Traditional Solapur Style Chutney: Best Indian Chutney Recipes: Spicy Peanut Chutney Recipe: Shengdana Chutney for Chapati and Rice: Healthy Solapur Chutney with Peanuts: सोलापूरी शेंगदाणा चटणी ट्राय करु शकता. ही चटणी महिनाभर टिकेल.

रोज त्याच त्याच भाज्या खाऊन अनेकांना वैताग येतो. अशावेळी काही चटपटती आणि झणझणीत खाण्याची इच्छा होते. (Solapur Peanut Chutney Recipe)गरमागरम भात किंवा भाकरीसोबत ठेचा किंवा चटणी खायला अनेकांना आवडते.(How to Make Shengdana Chutney Spicy) परंतु, तोच ठेचा किंवा चटणी खाताना आपण नाकही मुरडतो. महाराष्ट्रातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या किंवा ठेच्याची चव चाखली जाते. (Traditional Solapur Style Chutney) चटणी बनवताना कुणी कांदा-लसूण वापरतो किंवा कुणी मिरची. (Best Indian Chutney Recipes) उन्हाळा सुरु झाला की, आपण वाळवणाचे पदार्थ, लोणची, चटण्या बनवतो.(Healthy Solapur Chutney with Peanuts) जर तुम्ही देखील साठवणीचे पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर सोलापूरी शेंगदाणा चटणी ट्राय करु शकता. ही चटणी महिनाभर टिकेल. 

नागपूर स्पेशल झणझणीत पाटवडी करण्याची पाहा झटपट, पारंपरिक रेसिपी! न थापता करा मऊ लुसलुशीत वडी, तोंडाला येईल चव

साहित्य शेंगदाणे - १ वाटी तेल - १ चमचा  जिरे - १ चमचालसूण पाकळ्या - ५ ते ६लाल मिरची पावडर - १ चमचा मीठ - आवश्यकतेनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी तव्यावर शेंगदाणे ७ ते ८ मिनिटे चांगले भाजून घ्या. त्यानंतर त्याच्यावरचे साल काढा. 

2. नंतर एका कढईत तेल, जिरे लसूण पाकळ्या घालून लालसर होऊ द्या. 

3. आता गॅस बंद करुन त्यात लाल मिरची पावडर आणि भाजलेले शेंगदाणे घाला. 

4. सर्व साहित्य खलबत्त्यात कुटून घ्या. खलबत्त्यात कुटताना वरुन मीठ घाला त्यामुळे चांगली चव येईल. 

5. सोलापूरी शेंगदाणा चटणी भात किंवा भाकरीसोबत खा.  

टॅग्स :अन्नपाककृती