नुकताच दिवाळीचा सण मोठ्या आनंद, उत्साहात पार पडला. दिवाळीत शक्यतो गोड पदार्थ फार मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. दिवाळीला आपण एकमेकांना शुभेच्छा देताना काहीतरी गोड मिठाई आवर्जून घेऊन जातोच. या गोड मिठाईमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मिठाई असते. दिवाळीला मिठाईच्या प्रकारांमध्ये, सर्वात जास्त प्रमाणांत खाल्ली जाणारी सगळ्यात कॉमन मिठाई म्हणजे सोनपापडी. मऊ, मुलायम, गोड, भुसभुशीत अशी सोनपापडी खायला सगळ्यांनाच आवडते(leftover Sonpapdi Cake).
परंतु दिवाळीत शक्यतो फार मोठ्या प्रमाणांत या सोनपापडीचे बॉक्स जमा होतात. बरेचदा इतक्या जास्त प्रमाणांत सोनपापडी खाल्ली जात नाही. तसेच ती खूप दिवस स्टोअर करून ठेवली तर त्याचा रंग आणि चवीत फरक जाणवतो किंवा काहीवेळा ती खराब देखील होते. सोनपापडीचा बॉक्स एकदा उघडल्यानंतर ती सगळी संपापवी (How To Make Sonpapdi Cake From Leftover Diwali Sonpapdi) तरी लागते किंवा व्यवस्थित स्टोअर तरी करावी लागते, नाहीतर हवेच्या संपर्कात येऊन ही सोनपापडी अगदी दगडासारखी कडक होते. अशावेळी, ती फेकून द्यावी लागते. यासाठीच, दिवाळीत जास्त प्रमाणांत सोनपापडी उरली असेल तर त्यापासून आपण झटपट तयार होणारा इन्स्टंट केक तयार करु शकतो. उरलेल्या सोनपापडीचा वापर करुन केक तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Sonpapdi Cake At Home).
साहित्य :-
१. उरलेली सोनपापडी - १ बाऊल
२. दूध - गरजेनुसार
३. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून
४. बेकिंग पावडर - १ टेबलस्पून
५. ड्रायफ्रुटचे काप - २ ते ३ टेबलस्पून
६. टुटी फ्रुटी - १ टेबलस्पून
७. बटर - १ टेबलस्पून
भाऊबीजेला आणलेल्या रसमलईचा रस उरला? फेकून न देता करा झटपट होणारे ३ सोपे पदार्थ, चवीला उत्तम!
कृती :-
१. सर्वातआधी एका बाऊलमध्ये सोनपापडी घेऊन ती हातांनी दाबून कुस्करुन त्याचा भुगा करुन घ्यावा.
२. आता या सोनपापडीच्या भुशात गरजेनुसार दूध घालून त्याचे मध्यम कन्सिस्टंन्सीचे बॅटर तयार करून घ्यावे.
३. त्यानंतर या केकच्या बॅटरमध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून मिक्स करुन घ्यावे.
४. आता केक टिनच्या तळाशी बटर पेपर ठेवावा त्यानंतर या टिनच्या कडेला बटर लावून ग्रीस करून, त्यामध्ये हे तयार केकचे बॅटर ओतून घ्यावे.
५. त्यानंतर या बॅटरवर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुटचे काप, टुटी फ्रुटी भुरभुरवून घ्यावी.
६. आता हा केक ३५ ते ४० मिनिटे बेक करुन घ्यावा.
सोनपापडीचा झटपट तयार होणारा केक खाण्यासाठी तयार आहे.