आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या दिवसाची सुरुवात 'कॉफी' पिऊनच होते. कॉफी हे अनेकांचे आवडते पेय आहे. पावसाळा असो किंवा हिवाळा कॉफी मात्र प्रत्येक ऋतूमध्ये सगळ्यांना प्यायला आवडते. यातही जर का ती फक्त कॉफी नसून गरम वाफाळती फिल्टर कॉफी असेल तर मग विचारुच नका. गरमागरम वाफाळती फिल्टर कॉफी (Filter Coffee) पिणे याहून मोठे सुख नाही. फिल्टर कॉफी (Quick & EasyFilter Coffee Recipe) हा भारतातील सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. दक्षिण भारतात या कॉफीचा उगम झाला(Make FILTER COFFEE at Home without FILTER).
ही कॉफी बनवण्यासाठी विशिष्ठ प्रकारचं फिल्टर वापरलं जात. एकाच वेळी दोन ते तीन कप कॉफी तयार करणार ते मिनी फिल्टर असत. या फिल्टरमधील जाळीच्या भांड्यात कॉफी पावडर घालून त्यावर पुन्हा जाळीचंच झाकण असलेला स्टॅण्ड असतो. तो स्टॅण्ड घट्ट लावला जातो. त्यावर उकळत पाणी ओतलं की कॉफी विरघळून त्याच मिश्रण खालच्या भांड्यात फिल्टर होऊन जमा होत. मग हे कॉफीचं मिश्रण, गरम दूध, चवीनुसार साखर घालून दोन भांड्यात वर खाली करुन घेतलं की तयार होते ती फिल्टर कॉफी. ही फिल्टर कॉफी बहुतेक करुन मोठमोठाले हॉटेल्स, कॅफे, रेस्टॉरंट किंवा उडपी हॉटेल्समध्ये अगदी हमखास मिळते. ही फिल्टर कॉफी आपल्या नेहमीच्या कॉफीपेक्षा थोडी वेगळी असते. ही कॉफी बनवण्यासाठी लागणारे फिल्टर मशीन प्रत्येकाकडे असेलच असे नाही. अशावेळी या फिल्टरचा वापर न करता देखील आपण घरच्या घरी मस्त गरमागरम, फेसाळलेली फिल्टर कॉफी अगदी सहज तयार करु शकतो. फिल्टरचा वापर न करता उडुपी स्टाईलने फिल्टर कॉफी तयार करण्याची रेसिपी पाहूयात(How To Make South Indian Filter Coffee At Home).
साहित्य :-
१. उकळते पाणी - अर्धा कप
२. कॉफी पावडर - १ टेबलस्पून
३. दूध - १ कप
४. साखर - चवीनुसार
५. कॉटनचा कपडा
मदुराई स्पेशल ‘थन्नी चटणी’ खाऊन तर पाहा, इडली-डोसा लागेल मस्त-चमचमीत चटणीची रेसिपी...
रक्षाबंधन स्पेशल : नारळाच्या वड्या करताना ‘या’ ४ चुका टाळा, वड्या होतील फरफेक्ट पांढऱ्याशुभ्र...
कृती :-
१. एका भांड्यात पाणी घेऊन ते पाणी व्यवस्थित उकळवून घ्यावे.
२. पाणी व्यवस्थित उकळवून घेतल्यानंतर त्या उकळत्या पाण्यांत कॉफी पावडर घालून ती चमच्याने हलवून घ्यावी.
३. कॉफी पावडर उकळत्या पाण्यांत मिक्स झाल्यावर ५ ते १० मिनिटांसाठी या भांड्यावर झाकण ठेवून द्यावे. त्यानंतर एका वाटीवर एक कॉटनचा कपडा ठेवून हे कॉफीचे मिश्रण त्या कापडातून गाळून घ्यावे.
४. आता एका दुसऱ्या भांड्यात दूध घेऊन ते व्यवस्थित एक उकळी येईपर्यंत गरम करुन घ्या.
५. दुधात आपल्या आवडीनुसार साखर घालून ती विरघळवून घ्यावी.
६. आता या साखर घातलेल्या गरम दुधात कॉफीचे तयार करुन घेतलेले मिश्रण ओतावे आणि चमच्याच्या मदतीने कॉफी ढवळून घ्यावी.
७. त्यानंतर ही तयार झालेली कॉफी दोन भांड्यांच्या मदतीने वर खाली हलवून कॉफीचा फेस काढून घ्यावा.
फिल्टरचा वापर न करता गरमागरम फिल्टर कॉफी पिण्यासाठी तयार आहे.