Join us

उडूपी सांबार मसाला करण्याची खास रेसिपी- झटपट आणि घरगुती! विसरुन जाल विकतचे मसाले कायमचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2024 18:47 IST

How To Make South Indian Sambar Masala At Home : South Indian Sambar Masala recipe : ताजा-चविष्ट आणि परफेक्ट सांबार मसाला करण्याची रेसिपी...

इडली, मेदू वडा असे दाक्षिणात्य पदार्थ करायचे म्हटलं तर ते सांबार शिवाय खाणे म्हणजे अधुरेच आहे. गरमागरम इडली, मेदू वडा असे पदार्थ सांबारसोबतच खायला चांगले लागतात. इडली, डोसा, मेदू वडा हे पदार्थ जरी दाक्षिणात्य असले तरी आता हे पदार्थ सर्रास सगळ्यांच्या घरी नाश्त्याला मोठ्या आवडीने बनवले जातात. इडली, डोसा, मेदू वडा, उत्तप्पा यांच्यासोबत सांबार नसेल तर हा नाश्ता अपुराच वाटतो(South Indian Sambar Masala recipe).

दक्षिण भारतात सांबार ही रेसिपी अतिशय लोकप्रिय आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर करुन हे सांबार बनवले जाते हीच त्याची मुख्य खासियत आहे. प्रत्येकाची सांबार बनवण्याची पद्धत व चव वेगळीच असते. सांबार मध्ये तूरडाळ, शेवग्याच्या शेंगा, कांदा, टोमॅटो, दुधी भोपळा यासारख्या फळभाज्यांचा समावेश असतो. हे सांबार खाण्यासाठी जितके चविष्ट लागते तितकेच ते पौष्टिक असते. सांबार बनवण्यासाठी आणि टेस्टी होण्यासाठी विविध मसाल्यांचा वापर केला जातो. सांबार बनवताना त्याचा मसाला आपण जितका ताजा व फ्रेश बनवून घालू तितकी सांबारची चव अधिक उत्तम होण्यास मदत मिळते. सांबारमध्ये वापरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि चवीनुसार घातलेला सांबर मसाला या दोन्ही गोष्टींमुळे सांबर एकदम परफेक्ट तयार होते(How To Make South Indian Sambar Masala At Home).

साहित्य :- 

१. चणा डाळ - १ कप २. पांढरी उडीद डाळ - १ कप ३. तांदूळ - १ कप ४. मेथीचे दाणे - १ टेबलस्पून ५. धणे - १ कप ६. जिरे - १ कप ७. मोहरी - १ टेबलस्पून ८. हिंग - चवीनुसार ९. कढीपत्ता - २० ते २५ पाने १०. लाल सुक्या मिरच्या - १ कप ११. सुकं खोबर - १ कप १२. मीठ - १ टेबलस्पून १३. हळद - १ टेबलस्पून १४. काश्मिरी लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 

खवलेलं नारळ फ्रिजमध्ये ठेवलं तरी सुकतंच? ‘हा’ पदार्थ कालवून ठेवा, खवट न होता टिकेल खूप दिवस...

हिंदी सिनेमात गाजलेले ‘मुली के पराठे’ हिवाळ्यात तर खायलाच हवे, पाहा सोपी आणि पौष्टिक रेसिपी...

कृती :- 

१. सर्वप्रथम, एक पॅन घेऊन तो मंद आचेवर गरम करून घ्यावा त्यानंतर त्यात चणा डाळ, पांढरी उडीद डाळ, तांदूळ, मेथीचे दाणे चांगले भाजून घ्यावेत. २. त्यानंतर हे भाजून घेतल्यानंतर एका वेगळया भांड्यात गार होण्यासाठी काढून ठेवावेत. ३. आत त्याच पॅनमध्ये धणे, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून कोरडे भाजून घ्यावे. ४. हे मिश्रण भाजून घेतल्यानंतर एका दुसऱ्या भांड्यात काढून गार होण्यासाठी ठेवावे. 

५. त्यानंतर लाल सुक्या मिरच्या व सुकं खोबर वेगवेगळे कोरडे भाजून घ्यावे. ६. आता हे सर्व भाजून घेतलेले मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यावे त्यानंतर त्यात हळद, मीठ व काश्मिरी लाल मिरची पावडर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. 

सांबर मसाला तयार आहे. हा सांबर मसाला एका कोरड्या हवाबंद बरणीत भरुन ठेवावा.

टॅग्स :अन्नपाककृतीकिचन टिप्स