Lokmat Sakhi >Food > शिल्पा शेट्टीने शेअर केली तिच्या आजीची ‘नीर डोसा’ सिक्रेट रेसिपी, पाहा नेमका कसा करायचा...

शिल्पा शेट्टीने शेअर केली तिच्या आजीची ‘नीर डोसा’ सिक्रेट रेसिपी, पाहा नेमका कसा करायचा...

How To Make South Indian Style Neer Dosa At Home : नीर डोसा म्हणजे मोठं नजाकतीचं काम, शिल्पा शेट्टीही आजीच्या नीर डोशाची आठवण काढत सांगते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2023 06:31 PM2023-04-19T18:31:30+5:302023-04-19T18:47:25+5:30

How To Make South Indian Style Neer Dosa At Home : नीर डोसा म्हणजे मोठं नजाकतीचं काम, शिल्पा शेट्टीही आजीच्या नीर डोशाची आठवण काढत सांगते..

How To Make South Indian Style Neer Dosa At Home | शिल्पा शेट्टीने शेअर केली तिच्या आजीची ‘नीर डोसा’ सिक्रेट रेसिपी, पाहा नेमका कसा करायचा...

शिल्पा शेट्टीने शेअर केली तिच्या आजीची ‘नीर डोसा’ सिक्रेट रेसिपी, पाहा नेमका कसा करायचा...

भारतात साऊथ इंडिअन खाद्यपदार्थांमधील डोसा खूपच लोकप्रिय आहे. तव्यावर खरपूस भाजलेल्या कुरकुरीत डोसाच्या एक तुकडा मस्त चटणी किंवा  सांबरमध्ये बूडवून खाणं हे स्वर्गसुखापेक्षा नक्कीच कमी नाही. म्हणूनच भारतातच नाही तर जगभरात डोसा रेसिपी हा प्रकार अप्रतिम खाद्यपदार्थांच्या यादीत टॉप लिस्टमध्ये आहे. एवढंच नाही तर डोशाचे निरनिराळे प्रकार लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे एकाच प्रकारच्या बॅटरपासून तुम्ही डोशाचे विविध प्रकार तयार करू शकता. त्याचप्रमाणे डोसा तुम्ही विविध प्रकारच्या चटण्या आणि सांबरसोबत खाऊ शकता.

नीर म्हणजे पाणी, पाण्यासारखं याच मिश्रण पातळ असते, यात ओल खोबरे खवून घातले की छान असा जाळीदार डोसा तयार होतो. आपल्यापैकी बऱ्याच घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी छान, मऊ, लुसलुशीत नीर डोसा तयार केला जातो. नीर डोसा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. आपल्यासोबतच बॉलिवूडमधील काही खास सेलिब्रिटीजना देखील हा डोसा खायला भरपूर आवडतो. फिट अँड फाईन असलेली बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला देखील नीर डोसा फार आवडतो. शिल्पा नेहमीच आपले डाएट व एक्सरसाइज हे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमांतून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. शिल्पाने तिच्या आजीची सिक्रेट रेसिपी असणारा नीर डोसा कसा बनवायचा हे सांगितले आहे. तिच्या आजीची ही नीर डोसा बनवण्याची सोपी पद्धत काय आहे ते पाहुयात(How To Make South Indian Style Neer Dosa At Home). 

साहित्य :- 

१. तांदूळ - २ कप 
२. नारळाच्या खोबऱ्याचे लहान लहान तुकडे - १ कप 
३. पाणी - २ ते ३ कप 
४. मीठ - चवीनुसार 
५. तेल - ४ ते ५ टेबलस्पून

डोसा तव्याला चिकटू नये म्हणून ७ सोप्या टीप्स, डोसा तव्याला न चिकटता होईल हॉटेलसारखा कुरकुरीत...

 


कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये २ कप तांदूळ घेऊन ते ४ ते ५ वेळा व्यवस्थित धुवून घ्यावे. 
२. आता हे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ पाण्यांत संपूर्णपणे भिजतील असे ६ ते ८ तास किंवा पाण्यांत भिजवून घ्यावेत.
३. ६ ते ८ तासानंतर तांदूळ संपूर्ण भिजून झाल्यानंतर त्यात खोबऱ्याचे लहान लहान तुकडे घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. 

४. आता या नीर डोशाच्या बॅटरमध्ये, चवीनुसार मीठ घालून घ्यावे. 
५. त्यानंतर पॅन गरम करुन त्यावर थोडे तेल सोडावे. पॅनमध्ये चारही बाजुंनी तेल सोडल्यानंतर त्यावर नीर डोशाचे बॅटर गोलाकार आकारात घालून घ्यावे. 
६. आता या पॅनवर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटांपर्यंत हा नीर डोसा शिजवून घ्यावा. 
७. नीर डोसा दोन्ही बाजुंनी खरपूस शिजवून घ्यावा. 

जाळीदार डोसे, लुसलुशीत इडली हवी? पाहा डाळ तांदूळ प्रमाण गणित, करा परफेक्ट साऊथ इंडियन पदार्थ...

आता हा नीर डोसा खाण्यासाठी तयार आहे. हा नीर डोसा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.

Web Title: How To Make South Indian Style Neer Dosa At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.