भारतीय जेवणाच्या थाळीत चटणी असेल तर, जेवणाची लज्जत वाढते (Indian style Chutney). चटण्या अनेक प्रकारचे केले जातात. पांढरे तीळ, लसूण, हिरवी मिरची किंवा शेंगदाण्याची देखील चटणी केली जाते (Peanut - garlic chutney). चटणीमुळे आपण २ घास एक्स्ट्रा खातो (Food). भाजी आवडती नसेल किंवा भाजीची चव बिघडली तर चटणीमुळे पोटभर जेवता येते.
जर घरात भाजी उपलब्ध नसेल किंवा मनासारखी आवडती भाजी नसेल तर, आपण लसूण - शेंगदाण्याची चटणी तयार करू शकता (Cooking Tips). लसूण आणि शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. लसूण खाल्ल्याने इम्युनिटी बुस्ट होते, व पचनक्रियाही सुधारते. आपण पावसाळ्यात लसूण - शेंगदाण्याची चटणी करून खाऊ शकता(How To Make South Indian Style Peanut Garlic Chutney).
लसूण - शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य
लसूण
शेंगदाणे
हिरवी मिरची
हाडं कमजोर - अंगात रक्त कमी? रोज खा ‘हा’ १ पौष्टीक लाडू; कॅल्शियमही भरपूर
जिरं
चाट मसाला
मीठ
लिंबाचा रस
पाणी
कृती
सर्वात आधी गॅसवर रोस्टेड जाळी ठेवा. त्यात १० ते १२ लसणाच्या पाकळ्या, एक वाटी शेंगदाणे, ३ ते ४ हिरव्या मिरच्या घालून भाजून घ्या. सर्व साहित्य भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या.
नाश्त्याला करा २ बटाट्याचे कुरकुरीत मेदू वडे; इन्स्टंट रेसिपी; अगदी १० मिनिटात क्रिस्पी डिश रेडी
त्यात २ लाल सुक्या मिरच्या, एक चमचा जिरं, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आणि थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा. अशा प्रकारे लसूण - शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी रेडी. आपण या चटणीवर फोडणी घालूनही खाऊ शकता.