Lokmat Sakhi >Food > सोयाबीन कबाब खाऊन तर पाहा, मुलांच्या डब्यासाठी प्रोटीनपॅक रेसिपी-हॉटेलच्या कबाबांपेक्षा भारी...

सोयाबीन कबाब खाऊन तर पाहा, मुलांच्या डब्यासाठी प्रोटीनपॅक रेसिपी-हॉटेलच्या कबाबांपेक्षा भारी...

Soya Chunks Kebab : Soya Kabab Recipe : प्रेशर कुकरमध्ये झटपट तयार होणारे विकतसारखे सोयाबीन कबाब करा घरच्याघरीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 06:00 PM2024-08-30T18:00:19+5:302024-08-30T18:01:15+5:30

Soya Chunks Kebab : Soya Kabab Recipe : प्रेशर कुकरमध्ये झटपट तयार होणारे विकतसारखे सोयाबीन कबाब करा घरच्याघरीच...

How to Make Soya Chunks Kababs Easy & Delicious Recipe Soya Chunks Kebab Soya Kabab Recipe | सोयाबीन कबाब खाऊन तर पाहा, मुलांच्या डब्यासाठी प्रोटीनपॅक रेसिपी-हॉटेलच्या कबाबांपेक्षा भारी...

सोयाबीन कबाब खाऊन तर पाहा, मुलांच्या डब्यासाठी प्रोटीनपॅक रेसिपी-हॉटेलच्या कबाबांपेक्षा भारी...

सोयाबीन आहारात असणं खूप गरजेचं आहे. कारण सोयाबीनमध्ये प्रोटीनसोबत अनेक पोषक गुणधर्म असतात. सोया चंक्सचा वापर करुन आपण अनेक पदार्थ तयार करु शकतो. सोया चंक्सची सुकी किंवा ग्रेव्ही भाजी, सोयाबीन पुलाव, सोयाबीन कटलेट्स असे अनेक पदार्थ आपण खाऊन पाहिलेच असतील. एखाद्या हॉटेल (Soya Chunks Kebab) किंवा रेस्टोरंटमध्ये गेल्यावर आपण बरेचदा जेवणाआधी स्टार्टर ऑर्डर करतो. या स्टार्टरमध्ये आपण कबाब, कटलेट, मसाला पापड, पनीर चिल्ली असे अनेक पदार्थ खाण्याचा मनमुराद आनंद लुटतो. त्यातही जर कबाब असतील तर विचारुच नका(Soya Kabab Recipe).

आपण हॉटेलमध्ये गेल्यावर दही पनीर कबाब, हरभरा कबाब, पनीर कबाब असे कबाबचे अनेक प्रकार आवडीने खातो. परंतु जर का आपल्याला हेल्दी काहीतरी खायचे असेल तर आपण सोयाबीन चंक्सचा वापर करुन सोयाबीन चंक्स घरच्याघरी तयार करू शकतो. प्रेशर कुकरचा वापर करून आपण झटपट होणारे सोयाबीन कबाब तयार करु शकतो. सोयाबीन कबाब तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात(How to Make Soya Chunks Kababs Easy & Delicious Recipe).

साहित्य :- 

१. सोयाबीन चंक्स - १ कप (उकळवून घेतलेले सोयाबीन)
२. चणा डाळ - १ कप (भिजवून घेतलेली डाळ)
३. लसूण - ६ ते ७ लसूण पाकळ्या
४. हिरव्या मिरच्या - २ ते ३
५. जिरे - १ टेबलस्पून 
६. हळद - १/२ टेबलस्पून 
७. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 
८. गरम मसाला - १ टेबलस्पून 
९. मीठ - चवीनुसार 
१०. तूप - १ टेबलस्पून 
११. पाणी - गरजेनुसार 
१२. तेल - तळण्यासाठी  
१३. तांदुळाचे पीठ - २ टेबलस्पून 
१४. कांदा - २ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
१५. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१६. लिंबाचा रस -  १ टेबलस्पून 

घरच्याघरी विकतसारखे पॉपकॉर्न करा १ मिनिटांत, कुकरचीही गरज नाही- पाहा ही भन्नाट ट्रिक...


बटाट्याच्या सालांचे वेफर्स, कशी वाटली आयडिया? करा ५ मिनिटांत कुरकुरीत खाऊ-पोषणही भरपूर...

कृती :- 

१. सगळ्यातआधी सोयाबीन चंक्स पाण्यात उकळवून घ्यावेत. त्यानंतर या सोयाबीन चंक्समधील जास्तीचे पाणी काढून घ्यावे. आता हे सोयाबीन चंक्स एका बाऊलमध्ये घ्यावेत. त्यानंतर त्यात भिजवलेली चणा डाळ, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, जिरे, हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ,  तूप व गरजेनुसार पाणी घालून एकत्रित करून घ्यावे. हे सगळे जिन्नस एकत्रित करुन कुकरला लावून दोन शिट्ट्या काढून शिजवून घ्यावे. 

२. आता हे सोयाबीन कबाबचे कुकरमध्ये शिजवून घेतलेले मिश्रण थोडे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यावे. मिक्सरमध्ये फिरवून हे मिश्रण बारीक करून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. आता या मिश्रणात तांदुळाचे पीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून कबाबचे मिश्रण तयार करुन घ्यावे. 

३. आता या मिश्रणाचे गोलाकार चपट्या आकाराचे कबाब तयार करून घ्यावेत. एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवावे. या गरम तेलात हे कबाब सोडून दोन्ही बाजुंनी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस शॅलो फ्राय करुन घ्यावेत. 

सोयाबीन चंक्सचे गरमागरम कबाब खाण्यासाठी तयार आहेत. हे कबाब सर्व्ह करताना त्यावर लिंबाचा रस पिळून हिरवी चटणी किंवा सॉससोबत खाण्यासाठी द्यावेत.

Web Title: How to Make Soya Chunks Kababs Easy & Delicious Recipe Soya Chunks Kebab Soya Kabab Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.