सोयाबीन आहारात असणं खूप गरजेचं आहे. कारण सोयाबीनमध्ये प्रोटीनसोबत अनेक पोषक गुणधर्म असतात. सोया चंक्सचा वापर करुन आपण अनेक पदार्थ तयार करु शकतो. सोया चंक्सची सुकी किंवा ग्रेव्ही भाजी, सोयाबीन पुलाव ( High Protein Soya Keema Paratha), सोयाबीन कटलेट्स असे अनेक पदार्थ आपण खाऊन पाहिलेच असतील(Healthy Soya Keema Paratha).
एखाद्या हॉटेल किंवा रेस्टोरंटमध्ये गेल्यावर आपण बरेचदा सोया चंक्स पासून तयार केलेले असे अनेक पदार्थ खाण्याचा मनमुराद आनंद लुटतो. परंतु जर का आपल्याला हेल्दी काहीतरी खायचे असेल तर आपण सोयाबीन चंक्सचा (How to Make Soyabean chunks Parantha) वापर करुन सोयाबीन पराठा घरच्याघरीच तयार करू शकतो. एरवी आपण मेथी, बटाटा, मटार किंवा इतर पदार्थांपासून तयार झालेले पराठे खातोच. त्यामुळे काहीतरी वेगळं म्हणून सोया चंक्सची नेहमीची तीच ती भाजी करण्यापेक्षा सोया चंक्सचा मस्त चमचमीत, चटपटीत पराठा तयार करु शकतो. सोया चंक्सचा पराठा करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. सोयाबीन चंक्स - १ कप
२. पाणी - गरजेनुसार
३. मीठ - चवीनुसार
४. लसूण पाकळ्या - ६ ते ७ पाकळ्या
५. आलं - २ टेबलस्पून लहान तुकडे
६. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
७. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ मिरच्या
८. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
९. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
१०. हळद - १ टेबलस्पून
११. गरम मसाला - १ टेबलस्पून
१२. धणे पूड - १ टेबलस्पून
१३. जिरेपूड - १ टेबलस्पून
१४. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१५. गव्हाचे पीठ - २ कप
१६. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून
क्षिती जोगला फार आवडते आजीच्या हातचे आंबट वरण! पाहा आंबट वरणाची पारंपरिक रेसिपी...
पराठे कोरडे - सुके होतात? ७ टिप्स, परफेक्ट सॉफ्ट - मऊमुलायम पराठ्यांसाठी लक्षात ठेवा...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे मीठ घालून मग सोया चंक्स घालावेत. सोया चंक्स पाण्यांत हलकेच उकळवून घ्यावेत. उकळवून घेतल्यानंतर या सोया चंक्समधील जास्तीचे पाणी हाताने दाब देत काढून घ्यावे.
२. आता एका मिक्सरच्या भांड्यात सोया चंक्स, लसूण पाकळ्या, आलं घेऊन हे तिन्ही जिन्नस मिक्सरमध्ये हलकेच वाटून त्याची थोडी जाडसर भरड करून घ्यावी.
३. एका कढईत तेल घेऊन त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यावे. त्यानंतर त्यात सोया चंक्सची मिक्सरमध्ये वाटून घेतलेली भरड घालावी. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धणे पूड, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. ५ ते ६ मिनिटे हे सारण शिजवून घ्यावे. तयार सारण एका बाऊलमध्ये काढून थोडे थंड होण्यासाठी ठेवावे.
४. नेहमीप्रमाणे गव्हाच्या पिठाची कणिक मळून घ्यावी. आता या कणकेची एक नेहमीप्रमाणे चपाती लाटून घ्यावी. त्यानंतर बरोबर मधोमध सोया चंक्सचे तयार सारण घालावे. सारण घातल्यानंतर या चारही बाजू दुमडून बरोबर मध्यभागी आणाव्यात. त्यानंतर परत चौकोनी आकारात पराठा लाटून घ्यावा.
५. साजूक तूप पॅनवर लावून हा सोया चंक्स पराठा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावा.
गरमागरम सोया चंक्स पराठा खाण्यासाठी तयार आहे. आपण दही, लोणच, सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत हा पराठा खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.