Lokmat Sakhi >Food > खमंग खुसखुशीत ‘सोयाबिन थालीपीठ’ खाऊन तर पाहा, वजन कमी करण्यासाठीही पौष्टिक नाश्ता...

खमंग खुसखुशीत ‘सोयाबिन थालीपीठ’ खाऊन तर पाहा, वजन कमी करण्यासाठीही पौष्टिक नाश्ता...

How To Make Soyabean Thalipeeth At Home : भाजणीचं थालीपीठ तर आवडीचंच, सोयाबिन चंक्स वापरुन तेच थालीपीठ अजून चविष्ट आणि पौष्टिक करता येतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 03:18 PM2023-05-10T15:18:01+5:302023-05-10T15:25:41+5:30

How To Make Soyabean Thalipeeth At Home : भाजणीचं थालीपीठ तर आवडीचंच, सोयाबिन चंक्स वापरुन तेच थालीपीठ अजून चविष्ट आणि पौष्टिक करता येतं.

How To Make Soyabean Thalipeeth At Home | खमंग खुसखुशीत ‘सोयाबिन थालीपीठ’ खाऊन तर पाहा, वजन कमी करण्यासाठीही पौष्टिक नाश्ता...

खमंग खुसखुशीत ‘सोयाबिन थालीपीठ’ खाऊन तर पाहा, वजन कमी करण्यासाठीही पौष्टिक नाश्ता...

खमंग आणि खुसखुशीत थालीपीठाने खवय्यांना त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडलं आहे. त्याच्या चुरचुरीत-झणझणीत चवीची लज्जतच न्यारी असते. थालीपीठ हा अस्सल मराठमोळा पदार्थ आहे. आपल्यापैकी सगळ्यांच्याच घरी बहुतेकवेळा नाश्त्याला थालीपीठ केले जाते. हे गरमागरम थालीपीठ दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाण्यासाठी खूपच छान लागते. थालीपीठ हा असा पदार्थ आहे की जो आपल्यात कोणत्याही गोष्टी अगदी सहज सामावून घेतो. आपण काहीवेळा उरलेल्या भाज्यांचे थालीपीठ बनवतो तर काहीवेळा मिश्र डाळींचे थालीपीठ बनवले जाते. थालीपीठाच्या भाजणीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या आवडीचे पदार्थ घालून खरपूस थालीपीठ बनवू शकतो.   

भाजणीचं किंवा इतर पौष्टिक धान्यांची पीठ घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, जिरे, तीळ, वाटलेलं आलं-लसूण चांगलं मिसळायचं, थोडं थोडं पाणी मिसळत घट्ट मळायचं. त्याचे छोटे गोळे करायचे. तव्यावर तेल टाकून तो गोळा थापायचा. मध्ये छिद्र पाडलं की ते छान भाजलं जातं. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजायचं. लोणचं, चटणी, सॉस, दही असं काहीही सोबत असलं की फक्कड बेत जमतोच. कधी कांद्याऐवजी कोबी घालून, कधी पालक मिक्सरवर वाटून, कधी काकडी किसून त्यात घालून वेगवेगळे स्वादही ट्राय करता येतात. असेच आरोग्यासाठी हेल्दी सोया चंक्सचे थालीपीठ घरच्या घरी कसे बनवायचे त्याची सोपी कृती(How To Make Soyabean Thalipeeth At Home).

साहित्य :- 

१. सोया चंक्स - १ मोठा बाऊल 
२. बेसन - २ ते ३ टेबलस्पून 
३. मीठ - चवीनुसार 
४. हळद - १ टेबलस्पून 
५. जिरे - १ टेबलस्पून 
६. ओवा - १ टेबलस्पून 
७. आलं - १ टेबलस्पून (बारीक किसून घेतलेलं)
८. हिरव्या मिरच्या -  १ टेबलस्पून ( बारीक चिरून घेतलेली)
९. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)
१०. गाजर - १ टेबलस्पून (बारीक किसून घेतलेले)
११. कांदा - १ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेला)
१२. तेल - २ ते ३ टेबलस्पून 
१३. पाणी - १ बाऊल 

थालीपीठ करायचं पण भाजणीचं पीठच नाही? झटपट करा मिक्स पिठांचे खमंग मेथी थालीपीठ, पौष्टिक आणि पोटभर...

कृती :- 

१. सर्वप्रथम, सोया चंक्स गरम पाण्यात थोडा वेळ ठेवून फुलवून घ्यावेत. त्यानंतर हे सोया चंक्स हातांनी दाबून त्यातील सगळे पाणी काढून घ्यावेत. 
२. पाणी काढून घेतलेले हे सोया चंक्स मिक्सरमध्ये फिरवून त्याचा बारीक भुगा करुन घ्यावा. 
३. आता हा सोया चंक्सचा भुगा एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावा. 
४. त्यानंतर त्यात बेसन, मीठ, हळद, जिरे, ओवा, किसून घेतलेलं आलं, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, किसून घेतलेले गाजर, कांदा किंचित पाणी शिंपडून हे थालीपीठाचे पीठ मळून घ्यावे. 

इडली -डोशाचे पीठ छान आंबावे म्हणून त्यात सोडा घालता? तज्ज्ञ सांगतात, ते तातडीने बंद करा कारण...

भाजणीचे थालीपीठ तर आपण खातोच पण मंचूरियन थालीपीठ? हे थालीपीठ नक्की भारतीय म्हणायचे की चिनी...

५. पॅन मंद आचेवर गरम करुन त्यावर थोडेसे तेल सोडावे, आता हाताला थोडेसे पाणी लावून थालीपिठाचा एक गोळा तयार करुन घ्यावा. 
६. या गोळ्याचे थालीपीठ थापून घ्यावे या थापलेल्या थालीपीठाच्या बरोबर मधोमध २ छिद्रे करून घ्यावीत. 
७. आता पॅनमध्ये तेल सोडून त्यावर हे थालीपीठ दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे. 

थालीपीठ भाजून झाल्यानंतर ते दही किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी गरमागरम सर्व्ह करावे.

Web Title: How To Make Soyabean Thalipeeth At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.