Lokmat Sakhi >Food > ५ रुपयांच्या वेफर्स पुड्यात करा पोटभरीचे मसालेदार ‘वेफर्स चाट’! ५ मिनिटांत खा पोटभर...

५ रुपयांच्या वेफर्स पुड्यात करा पोटभरीचे मसालेदार ‘वेफर्स चाट’! ५ मिनिटांत खा पोटभर...

How To Make Spicy 'Wafers Chaat' At Home In Just 5 Minutes : पावसाळ्यात चमचमीत चाट बाहेर गाडीवर खाल्लं तर पोट बिघडेल अशी भीती वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 07:24 PM2023-07-07T19:24:41+5:302023-07-07T19:37:30+5:30

How To Make Spicy 'Wafers Chaat' At Home In Just 5 Minutes : पावसाळ्यात चमचमीत चाट बाहेर गाडीवर खाल्लं तर पोट बिघडेल अशी भीती वाटते?

How To Make Spicy 'Wafers Chaat' At Home In Just 5 Minutes | ५ रुपयांच्या वेफर्स पुड्यात करा पोटभरीचे मसालेदार ‘वेफर्स चाट’! ५ मिनिटांत खा पोटभर...

५ रुपयांच्या वेफर्स पुड्यात करा पोटभरीचे मसालेदार ‘वेफर्स चाट’! ५ मिनिटांत खा पोटभर...

'वेफर्स' हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण आवडीने खातात. आपल्याकडे उपवासापासून ते लहान मुलांच्या डब्यांत सुका खाऊ म्हणून वेफर्स दिले जातात. बटाट्याचे, केळ्याचे असे असंख्य प्रकारचे आणि अनेक फ्लेवर्सचे वेफर्स बाजारांत सहज उपलब्ध होतात. कधी चहासोबत तर कधी सँडविच, पिझ्झा, बर्गरसोबत हे वेफर्स असतील तर त्याची मजाच न्यारी. बटाट्यापासून केले जाणारे हे वेफर्स म्हणजे भारतीयांसाठी तोंडाला चव आणणारे आणि मूड चेंज करणारे ठरतात. सगळ्यांना वेड लावणाऱ्या या कुर्रमकुर्रम वेफर्सवर आपण पार तुटून पडतो.

शक्यतो आपण वेफर्सचे पाकीट विकत घेऊन क्षणांत ते फोडून फस्त करतो. परंतु याच वेफर्सचा वापर करून आपण त्यापासून एका नवीन भन्नाट सोपी रेसिपी बनवू शकतो. अनेकदा आपल्याला संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी काहीतरी चटपटीत, मसालेदार खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण भेळ, चिवडा, फरसाण, शेव, गाठीया असे मसालेदार पदार्थ खाणे पसंत करतो. परंतु याच वेफर्सचे आपण संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारे वेफर्स चाट बनवू शकतो. वेफर्स चाट बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How To Make Spicy 'Wafers Chaat' At Home In Just 5 Minutes). 

साहित्य :- 

१. वेफर्स - १ ते २ पाकीट 
२. बारीक चिरलेला टोमॅटो - १ कप 
३. बारीक चिरलेला कांदा - १ कप 
४. चीज क्यूब - १ क्यूब 
५. हिरवी चटणी - १ ते २ टेबलस्पून 
६. चाट मसाला - १/२ टेबलस्पून 
७. चिली फ्लेक्स - १/२ टेबलस्पून 
८. ओरेगॅनो - १/२ टेबलस्पून
९. मीठ - चवीनुसार  

कांदा-बटाटा भजी नेहमीची, करुन पाहा खमंग आलू-कॉर्न भजी, पावसाळ्यात चमचमीत खाण्याची चंगळ...

कृती :- 

१. सर्वप्रथम एक डिश घेऊन त्यात आपल्या आवडीच्या फ्लेवर्सचे वेफर्स गोलाकार आकारात अंथरून घ्यावेत. 
२. त्यानंतर त्या वेफर्सवर बारीक चिरलेला टोमॅटो सगळीकडे पसरून घालावा. 
३. आता त्या वेफर्सवर टोमॅटोप्रमाणेच बारीक चिरलेला कांदा पसरवून घालावा. 
४. त्यानंतर त्यावर चवीनुसार थोडे मीठ व चाट मसाला भुरभुरवून घ्यावा. 

गरमागरम वरणभात आणि तोंडी लावायला जवसाची चटणी, पावसाळ्यात ही पारंपरिक चटणी पोटाला बरी...

मस्त- खमंग- खुसखुशीत धपाटे एकदा खाऊन तर पहा! मराठवाड्याची खास पारंपरिक डिश, शाळेच्या डब्यासाठी परफेक्ट...

५. आता तयार हिरवी चटणी त्यावर सर्वत्र पसरून घालावी. 
६. त्यानंतर आपल्या आवडीनुसार त्यावर चीजचे छोटे - छोटे तुकडे पसरवून घालावे, तसेच चीज किसून सगळीकडे पसरवून घ्यावे. 
७. सर्वात शेवटी यावर चिली फ्लेक्स व ओरेगॅनो पसरवून टाकावे. 
८. हे सगळे तयार झाल्यानंतर मायक्रोवेव्हमध्ये २ ते ३ मिनिटांसाठी ठेवून गरम करून घ्यावे, जेणेकरून त्यावर घातलेले चीज वव्यवस्थित वितळेल. 


चटपटीत, मसालेदार वेफर्स चाट खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: How To Make Spicy 'Wafers Chaat' At Home In Just 5 Minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.