'बटाटा' हा असा पदार्थ आहे ज्याचा झटपट पदार्थ बनवून आपण खाऊ शकतो. आपण कोणत्याही पदार्थात बटाट्याचा वापर करु शकतो. घरांत काही भाजी नसली किंवा झटपट काही बनवायचे झाले तर बटाटा वापरुन आपण अनेक पदार्थ बनवू शकतो. बटाट्याची भाजी, काचऱ्या, बटाट्याचे काप, फिंगर्स चिप्स, बटाट्याचे वेफर्स असे बटाट्यापासून तयार होणारे अनेक पदार्थ आपल्या आवडीचे असतात. कधी भाजी कमी पडली तर आपण त्यात एक बटाटा घालून आयत्यावेळी वाढीव भाजी बनवू शकतो. बटाटा आणि स्नॅक्स (Street Style Potato Twister Recipe) पदार्थांचे तर एक प्रकारचे अतूट नाते आहे. असा कोणताही स्नॅक्सचा पदार्थ नाही जो बटाट्याशिवाय तयार होतच नाही(Potato Tornado Recipe without Machine).
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ठेल्यांवर मिळणारे बरेचसे पदार्थ आपण अगदी आवडीने ताव मारुन खातो. या सगळ्या पदार्थांमध्ये बटाटा हा आवर्जून वापरलाच जातो. हल्ली आपण रस्त्याच्या कडेला मिळणारा स्पायरल पोटॅटो(how to make potato twister at home)हा बटाट्याचा चमचमीत पदार्थ नक्कीच एकदा तरी खाऊन पाहिला असेलच. एका मोठ्या चॉपस्टिकला बटाट्याच्या गोलाकार चकत्या गुंडाळून (spiral potato recipe without machine) त्यावर बेसनाचे व मसाल्यांचे कोटिंग केले जाते. त्यानंतर खरपूस तळून त्यांवर मियॉनीज, सॉस किंवा पेरी पेरी मसाला घालून खाण्यासाठी दिला जातो. बटाट्याचा हा चमचमीत, मसालेदार पदार्थ आपण घरच्या घरी देखील तयार करु शकतो. रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या या टोर्नेडो पोटॅटोची सोपी रेसिपी(How to make Spiral Potato at home without machine).
साहित्य :-
१. बटाटे - २ ते ३
२. लाकडी फूड स्टिक / चॉपस्टिक - २ ते ३ स्टिक
३. बेसन - ३ ते ४ टेबलस्पून
४. तांदुळाचे पीठ - २ टेबलस्पून
५. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार
७. धणे पूड - १ टेबलस्पून
८. हळद - १ टेबलस्पून
९. पाणी - गरजेनुसार
१०. काश्मिरी लाल तिखट - १ टेबलस्पून
वडापावच्या गाड्यावर मिळते तशी सुकी लाल चटणी घरी बनवण्यासाठी वापरा १ सिक्रेट पदार्थ, चव अशी की...
भरपूर टोमॅटो विकत आणले पण लगेच खराब होतात ? १ सोपी ट्रिक- १० दिवस टोमॅटो राहतील फ्रेश...
कृती :-
१. सर्वप्रथम कच्चे बटाटे घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यावेत.
२. बटाटे धुवून घेतल्यानंतर एक लाकडी फूड स्टिक घ्या. व ती फूड स्टिक बटाटा उभा हातात धरुन, बटाटयाच्या बरोबर मधोमध उभी रोवून घ्या.
३. त्यानंतर घरातील विळी घेऊन त्या विळीवर हा बटाटा गोल गोल फिरवत त्याच्या एकसलग चकत्या पाडून घ्याव्यात.
४. आता एका बाऊलमध्ये बेसन, तांदुळाचे पीठ, लाल तिखट मसाला, मीठ, धणे पूड, हळद, काश्मिरी लाल तिखट घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून मध्यम कन्सिस्टंसीचे बॅटर तयार करून घ्यावे.
साजूक तुपाला बुरशी लागून खराब होऊ नये म्हणून ७ टिप्स, रवाळ, दाणेदार तूप टिकेल वर्षानुवर्षे...
पोळ्यांच्या डब्यातील पहिली पोळी वाफेने ओली होते ? २ सोपे उपाय, पोळी होणार नाही शिडशिडी...
५. त्यानंतर बटाटाच्याच्या तयार करून घेतलेल्या या सगळ्या स्पायरल रिंगला हे बेसनाचे बॅटर लावून घ्यावे.
६. आता एका मोठ्या कढईमध्ये तेल घेऊन त्यात हे बेसनने कोट केलेले स्पायरल पोटॅटो खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यावे.
७. स्पायरल पोटॅटो खरपूस तळून झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण त्यावर मियॉनीज, सॉस किंवा पेरी पेरी मसाला घालू शकतो.
अशाप्रकारे आपण बटाट्याचे बाजारांत विकत मिळतात तसे गरमागरम स्पायरल पोटॅटो घरच्या घरी बनवू शकतो.