Lokmat Sakhi >Food > ना बेसन, ना तांदूळ; १ कप पोह्यांचा करा जाळीदार, स्पंजी ढोकळा; मार्केटसारखा सॉफ्ट बनेल ढोकळा

ना बेसन, ना तांदूळ; १ कप पोह्यांचा करा जाळीदार, स्पंजी ढोकळा; मार्केटसारखा सॉफ्ट बनेल ढोकळा

How To Make Spongy Soft Dhokla : पोह्यांपासून तयार केलेला  ढोकळा खाल्ला तर तुम्ही बेसनाचा ढोकळा खाणं विसरून जाल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 03:19 PM2024-06-26T15:19:49+5:302024-06-26T15:24:44+5:30

How To Make Spongy Soft Dhokla : पोह्यांपासून तयार केलेला  ढोकळा खाल्ला तर तुम्ही बेसनाचा ढोकळा खाणं विसरून जाल.

How To Make Spongy Soft Poha Dhokla : Homemade Poha Dhokla Recipe | ना बेसन, ना तांदूळ; १ कप पोह्यांचा करा जाळीदार, स्पंजी ढोकळा; मार्केटसारखा सॉफ्ट बनेल ढोकळा

ना बेसन, ना तांदूळ; १ कप पोह्यांचा करा जाळीदार, स्पंजी ढोकळा; मार्केटसारखा सॉफ्ट बनेल ढोकळा

सकाळी सकाळी काही हेल्दी आणि  टेस्टी खावंसं वाटतं तर बरेचजण पोहे खाणं पसंत करतात. (Kitchen Hacks) तुम्ही पोहे खाऊन बोअर झाला असाल तर पोह्यांचा ढोकळा बनवू शकता. (How To Make Dhokla) पोह्यांचा ढोकळा हा स्वादीष्ट, स्पंजी असतो. हा ढोकळा (Dhokla) बनवणं फार सोपं आहे. (Cooking Tricks & Tips) ढोकळा खायला अनेकांना आवडतो कारण हे खूपच सॉफ्ट, लाईट असतात. पोह्यांपासून तयार केलेला  ढोकळा खाल्ला तर तुम्ही बेसनाचा ढोकळा खाणं विसरून जाल. (Homemade Poha Dhokla Recipe) संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पोह्यांचा ढोकळा खाऊ शकता. पोह्यांचा ढोकळा कसा करायचा हे पाहूया. (How To Make Spongy Soft Dhokla)

1) पोह्यांचा ढोकळा करण्यासाठी १ कप पोह्यांची आवश्यकता असेल आणि १ कप रवा वापरा. ढोकळा करण्यासाठी १ कप दही आणि अर्धा टि स्पून बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घाला. फोडणी देण्यासाठी १ टिस्पून तेलात ८ ते १० कढीपत्ता, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, १ चिमुट हिंग, २ चिमुट मोहोरी, अर्धा टिस्पून हळद घाला.

सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या कमीच होत नाही? ‘या’ बिया १ ग्लास पाण्यात घालून प्या!

2) पोहे साफ करून  २ ते ३ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या नंतर २ तासांसाठी भिजवून ठेवा.  त्यानंतर त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून टाका. नंतर मिक्सरमध्ये घालून मऊ पेस्ट बनवा. पोह्यांची तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि त्यात रवा मिक्स करा. 

3) दही व्यवस्थित फेटून घ्या त्यात पोहे आणि रव्याचं मिश्रण घाला. १५ मिनिटांसाठी हे मिश्रण  झाकून ठेवून द्या.  नंतर हे मिश्रण फेटून त्यात बेकिंग सोडा मिक्स करा.  आता पाणी थोडावेळ उकळण्यासाठी ठेवा. त्यात ढोकळ्याची प्लेट ठेवून २० ते २५ मिनिटांसाठी झाकून ठेवा. तयार आहे स्वादीष्ट एकदम स्पंजी पोहा ढोकळा. हा ढोकळा थंड झाल्यानंतर त्यावर फोडणी देऊन चटणीबरोबर खाऊ शकता.

पोट-दंडांची चरबी लटकतेय? रोज १ चमचा 'ही' घरगुती पावडर खा, १ आठवड्यात चरबी झरझर उतरेल

४) फोडणी देण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घाला आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहोरी, हिंग, हिरवी मिरची, हळद आणि कढीपत्ता घाला. यात थोडं पाणी घाला अधिक गोडवा येण्यासाठी तुम्ही १ चमचा साखरही घालू शकता.  फोडणी ढोकळ्याच्या थाळीत व्यवस्थित पसरवून ठेवा त्यानंतर सुरीच्या साहाय्याने कापून खा. पोह्यांपासून तयार झालेला हा ढोकळा भरपूर टेस्टी लागतो तसंच  चवीलाही चांगला असतो. 

Web Title: How To Make Spongy Soft Poha Dhokla : Homemade Poha Dhokla Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.