कडधान्यांमध्ये मूग, मटकी (Sprouts) आवर्जुन खाल्ली जाते. कडधान्य (Moong-Matki) खाल्ल्याने शरीराला बरेच पोषक घटक मिळतात. कडधान्ये प्रोटिन्स आणि इतर महत्वाच्या पोषक घटकांचा उत्तम स्रोत आहे. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, आहारात मूग, मटकीचा नक्कीच समावेश करा (Food). आपण मिसळ किंवा कडधन्याची उसळ तयार करतो. उसळ आणि मिसळ चवीला भन्नाटही लागतात (Cooking Tips). पण मोड आल्याशिवाय मटकी आणि मुगाची चव वाढत नाही.
पण घरात भिजत घातल्यावर मूग आणि मटकीला बाजारात मिळते तशी मोड येत नाही. जर आपल्याला घरात परफेक्ट मटकी किंवा मूग भिजत घालायची असेल, आणि मोड हवी असेल तर, एक ट्रिक फॉलो करा. या पद्धतीने मटकी किंवा मूग भिजत घातल्याने कडधन्याला छान लांब मोड येतील. शिवाय चवीलाही छान लागतील(How to Make Sprouts at Home | How to Sprout Moong - Matki).
मूग - मटकीला मोड येईल कशी?
- कडधान्य भिजत घालण्यापूर्वी एका बाऊलमध्ये एक कप कोणतेहीकडधान्य घ्या. त्यात पाणी घालून कडधान्य स्वच्छ धुवून घ्या. पाणी काढून त्यात दुसरे पाणी घाला. कडधान्याच्या तीनपट पाणी घाला.
हिवाळ्यातही अपचनाचा त्रास? आंबट ढेकर - ॲसिडिटीने हैराण? २ चुका टाळा; तज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात..
- पाणी घातल्यानंतर भांड्यावर झाकण ठेवा. ७ - ८ तास भिजत ठेवा. कडधान्य भिजले आहे की नाही हे चेक करा. अतिरिक्त पाणी उरले असेल तर, फेकून द्या.
- आता एक सुती कापड घ्या. त्यात भिजलेले कडधान्य घाला. घालून गाठ मारा. त्यावर हाताने पाणी शिंपडा.
गरम - गार पदार्थ खाल्ल्यावर ठणक लागतो? १ टीप; तज्ज्ञ सांगतात - दातांमध्ये तीव्र वेदना जाणवणार नाही
- आता एक भांडं घ्या. त्यावर चाळण ठेवा. मग त्यात सुती कापडात गुंडाळलेले कडधान्य ठेवून झाकण ठेवा.
- रात्रभर कडधान्य तशीच ठेवा. जेणेकरून कडधान्याला छान मोड येईल. या पद्धतीने भिजत घातल्यास कडधन्याला छान मोड येईल.