Join us  

वाफेवरची उकडलेली चपाती कधी खाल्ली आहे? वजन कमी करायचं तर घ्या बिना तेल-तुपाची झटपट चपाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2024 12:57 PM

how to make steamed chapati recipe : चपाती भाजी खाल्ली नाही तर पोट भरत नाही, मग ही घ्या चपाती करण्याची खास पद्धत, वजनही वाढणार नाही

भारतीय थाळीमध्ये चपाती (Chapati) भाजी हमखास असतेच. चपाती भाजी खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. शिवाय काही खाल्ल्यासारखं वाटतही नाही. आपण दररोज चपाती भाजी खातो. चपाती भाजी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. काही ठिकाणी चपातीला, पोळी, फुलके किंवा रोटी म्हणतात. चपाती करण्याची पद्धत जवळपास सगळ्यांची सारखीच आहे. पण आपण कधी वाफेवरची पोळी करून पाहिली आहे का?

आता तुम्ही म्हणाल वाफेवरची भाजी, मोदक किंवा मोमोस खाल्ले आहेत. पण वाफेवरची पोळी कशी तयार करतात बुवा? जर आपल्याला रोजची त्याच प्रकारची शेकलेली चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा वाफेवरची पोळी ट्राय करून पाहा (Cooking Tips). जबरदस्त रेसिपी, काही मिनिटात तयार होते. शिवाय तेलाचा वापर न करता पोळी रेडी होते(how to make steamed chapati recipe).

वाफेवरची पोळी करण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचं पीठ

मीठ

ना इनो, ना दही - चहाच्या पातेल्यात करा झटपट हलकाफुलका ढोकळा, १० मिनिटांत करा मस्त ढोकळा

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका परातीत २ वाट्या गव्हाचं पीठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्या. कणिक मळून झाल्यानंतर त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. कणिक व्यवस्थित भिजल्यानंतर त्याचे गोळे तयार करा, आणि ज्याप्रमाणे आपण चपात्या लाटून घेतो, त्याचप्रमाणे पातळ पोळी लाटून घ्या.

दह्याला सुटलेले पाणी खावे की टाकून द्यावे? तज्ज्ञ सांगतात, दह्याला सुटलेल्या पाण्याचं नक्की करायचं काय?

दुसरीकडे एका पातेल्यात २ ग्लास पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर एक सुती कापड दोरीने बांधून घ्या. जर आपल्याकडे सुती कापड नसेल तर, आपण चाळणीमध्ये देखील पोळी वाफेवर शिजवू शकता. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर एक चपाती ठेवून त्यावर झाकणाने कव्हर करा. १ मिनिटानंतर पोळीची दुसरी बाजू देखील एका मिनिटासाठी वाफेवर शिजवून घ्या. वाफेवर शिजल्यानंतर पोळी एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे वाफेवरची पोळी खाण्यासाठी रेडी. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी ही पोळी बेस्ट आहे. आपण ही पोळी भाजी किंवा वरणासोबत खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स