Lokmat Sakhi >Food > स्ट्रॉबेरीची चटणी एकदा खा, मग म्हणाल की आधी का नाही दिली रेसिपी! चटकमटक मस्त चव

स्ट्रॉबेरीची चटणी एकदा खा, मग म्हणाल की आधी का नाही दिली रेसिपी! चटकमटक मस्त चव

Strawberry Chutney Recipe: स्ट्रॉबेरी नुसतीच खाण्यापेक्षा कधी तरी तिची चटकदार चटणी करून पाहा. घ्या शेफ स्मिता देव यांनी सांगितलेली खास रेसिपी.(easy and simple recipe of making strawberry chutney)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2025 19:02 IST2025-02-06T17:35:14+5:302025-02-06T19:02:15+5:30

Strawberry Chutney Recipe: स्ट्रॉबेरी नुसतीच खाण्यापेक्षा कधी तरी तिची चटकदार चटणी करून पाहा. घ्या शेफ स्मिता देव यांनी सांगितलेली खास रेसिपी.(easy and simple recipe of making strawberry chutney)

how to make strawberry chutney, easy and simple recipe of making strawberry chutney | स्ट्रॉबेरीची चटणी एकदा खा, मग म्हणाल की आधी का नाही दिली रेसिपी! चटकमटक मस्त चव

स्ट्रॉबेरीची चटणी एकदा खा, मग म्हणाल की आधी का नाही दिली रेसिपी! चटकमटक मस्त चव

Highlightsचटणीची रेसिपी अतिशय सोपी असून ती तुम्ही जेवणात तोंडी लावायला तर घेऊच शकता पण नाचोज, चिप्स यासोबत डिप म्हणूनही खाऊ शकता.

स्ट्रॉबेरी हे फळ आजही अनेकांच्या आकर्षणाचा बिंदू आहे. कारण हे आंबट- गोड असं चवदार, रसरशीत फळ वर्षातून काही मोजक्या महिन्यांतच आपल्याला खायला मिळते. सध्या स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरूच आहे. त्यामुळे बाजारात भरपूर प्रमाणात स्ट्रॉबेरी विकायला आलेल्या आहेत. आता काही जण स्ट्रॉबेरी नुसतीच खातात तर काही जण तिचा जॅम, जेलीसुद्धा करून ठेवतात. तुम्हीही स्ट्रॉबेरीचे हे चवदार पदार्थ तर कराच, पण त्यासोबतच स्ट्रॉबेरीची चटकदार चटणीही यंदा करून पाहा (easy and simple recipe of making strawberry chutney). चटणीची रेसिपी अतिशय सोपी असून ती तुम्ही जेवणात तोंडी लावायला तर घेऊच शकता पण नाचोज, चिप्स यासोबत डिप म्हणूनही खाऊ शकता. (how to make strawberry chutney?)

 

स्ट्रॉबेरी चटणी करण्याची रेसिपी

स्ट्रॉबेरी चटणी कशी करायची याची रेसिपी शेफ स्मिता देव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

साहित्य

१०० ग्रॅम स्ट्रॉबेरी

३ ते ४ हिरव्या मिरच्या

१ टीस्पून जिरेपूड

फक्त ५ फूट १ इंच उंची असूनही आलिया भट नेहमी उंच कशी दिसते? बघा तिचे ३ सिक्रेट्स..

१ टीस्पून धनेपूड

चवीनुसार थोडंसं मीठ

१ टीस्पून साखर

१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर 

 

कृती 

१. सगळ्यात आधी तर स्ट्रॉबेरी मिठाच्या पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजवत ठेवा आणि नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर एखाद्या कपड्याने पुसून ती काेरडी करून घ्या.

२. आता स्ट्रॉबेरीच्या बारीक फोडी करा आणि त्या एका कढईमध्ये घाला.

चेहऱ्यावर सतत येणाऱ्या ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्समुळे वैतागलात? ३ उपाय- त्वचा होईल स्वच्छ, नितळ

३. त्या कढईमध्येच हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घाला. त्यासोबतच जिरेपूड, धनेपूड, मीठ आणि साखर असं सगळंच घाला.

४. सगळे पदार्थ घालून झाले की मग गॅस सुरू करा आणि सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. २ ते ३ मिनिटांतच ती शिजल्यासारखी होईल. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि पुन्हा एकदा २ ते ३ मिनिटांसाठी चटणी शिजवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा. मस्त आंबट, गोड, तिखट चवीची स्ट्रॉबेरी चटणी तयार.. 


 

Web Title: how to make strawberry chutney, easy and simple recipe of making strawberry chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.