Lokmat Sakhi >Food > घरच्या पावभाजीला विकतसारखी चव- रंग येतच नाही? २ सिक्रेट टिप्स- स्ट्रीटस्टाईल पावभाजी आता घरीच 

घरच्या पावभाजीला विकतसारखी चव- रंग येतच नाही? २ सिक्रेट टिप्स- स्ट्रीटस्टाईल पावभाजी आता घरीच 

How To Make Street Style Pav Bhaji At Home: घरच्या पावभाजीला विकतच्यासारखी चटपटीत चव येण्यासाठी या काही सिक्रेट गोष्टी लक्षात ठेवा...(food and recipe- Secret tips for Street style Pavbhaji)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2023 01:06 PM2023-12-08T13:06:17+5:302023-12-08T13:08:05+5:30

How To Make Street Style Pav Bhaji At Home: घरच्या पावभाजीला विकतच्यासारखी चटपटीत चव येण्यासाठी या काही सिक्रेट गोष्टी लक्षात ठेवा...(food and recipe- Secret tips for Street style Pavbhaji)

How to make street style pav bhaji at home? Secret tips for Street style Pavbhaji, how to maintain color and taste of pavbhaji? | घरच्या पावभाजीला विकतसारखी चव- रंग येतच नाही? २ सिक्रेट टिप्स- स्ट्रीटस्टाईल पावभाजी आता घरीच 

घरच्या पावभाजीला विकतसारखी चव- रंग येतच नाही? २ सिक्रेट टिप्स- स्ट्रीटस्टाईल पावभाजी आता घरीच 

Highlightsपावभाजी करताना या दोन टिप्स फॉलो करा..बघा पावभाजीचा रंग आणि चव दोन्हीही अगदी गाड्यावर मिळणाऱ्या स्ट्रीट स्टाईल पावभाजीसारखी असेल...

पावभाजी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतांश लोकांच्या आवडीचा विषय. शिवाय पावभाजीची भाजी करताना आपण त्यात  बऱ्याच भाज्या घालतो. त्यामुळे एरवी वेगवेगळ्या भाज्या पाहून नाक मुरडणारी लहान मुलंही पावभाजीतल्या वेगवेगळ्या भाज्या मिटक्या मारत खातात. त्यामुळे अनेक जणी महिन्यातून एक- दोनदा हमखास घरी पावभाजी करतात. पण घरची पावभाजी  कितीही मेहनत घेऊन केली तरी तिला काही गाड्यावर मिळणाऱ्या पावभाजीची चव आणि रंग येत नाही, ही अनेकींची तक्रार असते (how to maintain color and taste of pavbhaji?). तुम्हालाही तसंच वाटत असेल तर यापुढे पावभाजी करताना या दोन टिप्स फॉलो करा.. (Secret tips for Street style Pavbhaji) बघा पावभाजीचा रंग आणि चव दोन्हीही अगदी गाड्यावर मिळणाऱ्या स्ट्रीट स्टाईल पावभाजीसारखी असेल...(How to make street style pav bhaji at home?)

 

विकतसारखी पावभाजी घरी करण्यासाठी टिप्स...

पावभाजीला छान रंग यावा यासाठी अनेकजणी त्यात बीटरुट घालतात किंवा खाण्याच्या रंगाचा वापर करतात. पण या दोन्ही गोष्टींमुळे तुमच्या पावभाजीचा रंग जरूर बदलेल. पण तिला मात्र विकतसारखी चव येणार नाही. म्हणूनच रंग आणि चव या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी या काही सिक्रेट टिप्स बघा..

स्वयंपाक करताना असा तडका दिला की वरचा मंडप..... बघा स्वयंपाक करण्याचा हा भन्नाट व्हायरल व्हिडिओ 

१. पावभाजीचा रंग आणि स्वाद दोन्ही अगदी विकतच्यासारखं असावं असं वाटत असेल तर आपल्याला त्यासाठी एक घरगुती मसाला तयार करावा लागेल. हा मसाला तयार करण्यासाठी १ टीस्पून तिखट, १ टीस्पून पावभाजी मसाला, १ टीस्पून गरम मसाला, अर्धा टी स्पून चाट मसाला, १ टीस्पून लोणच्याचा खार किंवा लोणचे मसाला असं साहित्य लागणार आहे.

हा बघा करिना कपूरचा तब्बल ५ लाखांचा चमचमता मेटॅलिक गाऊन, बघा त्या गाऊनची खासियत

हे सगळं साहित्य गरम पाण्यात कालवून घ्या आणि त्याची थोडीशी सेमीसॉलिड प्रकारातली पेस्ट तयार करा. जेव्हा पावभाजी करण्यासाठी तुम्ही कांदा- लसूण परतून घ्याल तेव्हा टोमॅटो अर्धे परतून झाल्यावर त्यात ही पेस्ट टाका आणि परतून घ्या. पावभाजीला छान चव येईल.

 

२. दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे पावभाजीला विकतच्यासारखा रंग येण्यासाठी देखील ही पेस्ट वापरायची आहे.

ब्रायडल स्निकर्सचा भन्नाट ट्रेण्ड, हल्ली नवरी भरजरी साडीवर- लेहेंग्यावर घालते स्निकर्स- पाहा लेटेस्ट फॅशन.... 

त्यासाठी पावभाजी जेव्हा पुर्णपणे तयार होईल तेव्हा एका छोट्या कढईत तेल किंवा बटर गरम करा आणि मग त्यात ही पेस्ट परतून ती तेल किंवा बटरसकट पावभाजीत टाका. बघा पावभाजीची चव आणि रंग दोन्ही कसं परफेक्ट जमून येईल. 
 

Web Title: How to make street style pav bhaji at home? Secret tips for Street style Pavbhaji, how to maintain color and taste of pavbhaji?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.