Lokmat Sakhi >Food > विकतसारखे खारे शेंगदाणे घरीच करा झटपट, गरमागरम खारे शेंगदाणे खाण्याची मजाच काही और

विकतसारखे खारे शेंगदाणे घरीच करा झटपट, गरमागरम खारे शेंगदाणे खाण्याची मजाच काही और

How To Make Street-Style Roasted Salted Peanuts : शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. यात पोषक तत्व सुद्धा असतात जे शरीराला ताकद  देतात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 12:22 PM2023-09-03T12:22:30+5:302023-09-04T15:16:45+5:30

How To Make Street-Style Roasted Salted Peanuts : शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. यात पोषक तत्व सुद्धा असतात जे शरीराला ताकद  देतात

How to Make Street-Style Roasted Salted Peanuts : Salted Roasted Peanuts Khari Sing Recipe | विकतसारखे खारे शेंगदाणे घरीच करा झटपट, गरमागरम खारे शेंगदाणे खाण्याची मजाच काही और

विकतसारखे खारे शेंगदाणे घरीच करा झटपट, गरमागरम खारे शेंगदाणे खाण्याची मजाच काही और

मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी खारे शेंगदाणे हा उत्तम पर्याय आहे. शेंगदाणे प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. (Salted Roasted Peanuts Khari Sing Recipe)पण नेहमीच बाहेरचे शेंगदाणे-चणे खाल्ल्यामुळे तब्येतीला धोका पोहोचू शकतो. त्यापेक्षा घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही नमकिन शेंगदाणे बनवू शकता. (How To Make Salted Peanuts At Home)

१) खारे शेंगदाणे बनवण्यासाठी सगळ्यात आधी पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळ्यानंतर त्यात शेंगदाणे घाला. शेंगदाणे २ ते ३ मिनिटं या पाण्यात ठेवल्यानंतर बाहेर काढा.

२) एका स्वच्छ, कोरड्या कापडावर सुकवण्यासाठी ठेवा.  त्यानंतर एका कढईत ३ ते ३ वाटी मीठ घाला. 

३) मीठ गरम झाल्यानंतर त्यात शेंगदाणे घालून ते भाजून घ्या. भाजलेले शेंगदाणे झारा किंवा चमच्याच्या साहाय्याने वर काढून घ्या. तयार आहेत खारे शेंगदाणे. 

४) मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी  हा उत्तम पर्याय आहे. शेंगदाणे तुम्हाला बाहेरून विकत घ्यावे लागणार नाही. या पद्धतीने तुम्ही चणेसुद्धा घरी बनवू शकता. 

शेंगदाणे खाण्याचे फायदे

१)  शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. यात पोषक तत्व सुद्धा असतात जे शरीराला ताकद  देतात.

२) शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होण्यास मदत होते  जर तुम्ही नियमित शेंगदाणे खाल्ले तर हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त कोलेस्टेरॉलही वाढत नाही.

३) शेंगदाण्यांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटामीन डी सु्द्धा असते.  हा एक नैसर्गिक आणि स्वस्त पदार्थ आहे.  याच्या सेवनाने हाडं मजबूत राहण्यास मदत होते. 

४)  शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटामीन्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनानं  स्किन ग्लोईंग दिसते. 

५) भाजलेल्या शेंगदाण्यांच्या तुलनेत  उकळेल्या शेंगदाण्यांमध्ये एंटी ऑक्सिडेंट्स जास्त प्रमाणात असतात. यामुळे इम्यूनिटी वाढते आणि युव्ही किरणांपासून होणारं नुकसान टाळता येतं.

६) उकळलेल्या शेंगदाण्यांमध्ये फायबर्स जास्त प्रमाणात असतात. यामुळे मेटाबॉलिझ्म बूस्ट होते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. शेंगदाणे खाल्ल्याने आतडेही चांगले राहतात.

७) शेंगदाणे खाणं डोळ्यांच्या आरोग्यासाठीही उत्तम ठरतं. शेंगदाण्यांमध्ये व्हिटामीन ए, व्हिटामीन बी-६ भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

Web Title: How to Make Street-Style Roasted Salted Peanuts : Salted Roasted Peanuts Khari Sing Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.