ऊन्हाळ्याच्या दिवसांत नेहमीच काहीतरी थंड पिण्याची किंवा खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेहमीच बाजारातील थंड ज्यूस प्यायला उपलब्ध असतात असं नाही. (Homemade Sugarcane Juice) घरच्याघरी तुम्ही ऊसाचा रस बनवू शकता. ऊसाचा रस बनवण्यासाठी तुम्हाला मोठी मशिन लागेल असं नाही. घरी ऊस नसतानाही तुम्ही ऊसाचा रस करू शकता. ऊसाचा रस करण्याची सोपी पद्धत कोणती ते पाहूया. (How To Make Sugarcane Juice At Home)
ऊसाचा रस कसा करायचा?
सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात मध्यम आकाराचे गुळाचे खडे घाला. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात लिंबाचा रस पिळून घाला. त्यात पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यात काळं मीठ घाला. त्यात तुळशीची पानं घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. यानंतर एका ग्लासात गाळून या रसाचे सेवन करा.
ऊसाचा रस पिण्याचे फायदे
1) ऊन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा रस प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. दुपारच्यावेळी ऊसाच्या रसाचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. ऊसाचा रस तब्येतीसाठी एक उत्तम टॉनिक आहे.
2) ऊसाच्या रसात मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे शरीरात पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता उद्भवत नाही. ज्यामुळे गॅस होत नाही.
गुलाबाला पानंच खूप-फुलं कमी येतात? 'या' फळाचे साल मातीत घाला-भराभर गुलाबं येतील
3) वजन कमी करण्यासाठी ऊसाचा रस हा एक उत्तम उपाय आहे. तुम्हाला तब्येतीचे त्रास उद्भवत असतील तर ऊसाच्या रसाचे सेवन केल्यानं आजारांपासून लांब राहण्यास मदत होईल.
4) सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट रूजूता दिवेकर सांगतात की ऊसाचा रस पिण्याची योग्य वेळ दुपारची आहे. ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते.
पोळपाट- लाटणं न वापरता गोल चपाती करण्याची १ सोपी ट्रिक; मशिनचीही गरज नाही- पाहा हाताची जादू
5) तुम्हाला ऊसाचा रस कितीही आवडत असला तरी एकावेळी 2 ग्लासपेक्षा जास्त उसाचा रस पिणं टाळायला हवं.