सणासुदीला प्रत्येकाच्याच घरात गोड धोड पदार्थ बनवले जातात. नेहमी नेहमी बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा घरच्याघरी कमीत कमी साहित्यात तुम्ही मिठाईच्या दुकानात मिळतात तसे गोड पदार्थ बनवू शकता. (Ravyache gulab jam in marathi) गुलाबजाम सर्वांनाच खायला आवडतात. पण गुलाबजामचा पाक बनवण्यापासून ते गोळे तळेपर्यंत अनेक स्टेप्स लक्षपूर्वक कराव्या लागतात अन्यथा पदार्थ बिघडण्याची शक्यता असते. मावा न वापरता रव्याचे सॉफ्ट गुलाबजाम बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to Make Rawa Gulabjam at Home)
रव्याचे गुलाबजाम कसे बनवावेत? (How to make Rawa Gulabjamun at home)
1) रव्याचे गुलाब जाम बनवण्यासाठी सगळ्यात आधी पाक तयार करून घ्या. ४ कप साखर घेऊन त्यात ३ कप पाणी घालून साखरेचा पाक तयार करून घ्या. पाण्याला उकळ आल्यानंतर चमच्याने हलवत राहा. जेणेकरून पूर्ण साखर व्यवस्थित विरघळेल. यात अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. जेणेकरून साखरेचा पाकात खडे तयार होणार नाहीत.
उड्डपीस्टाईल परफेक्ट सांबार घरीच बनेल; 'हा' सिक्रेट मसाला घाला, हॉटेलसारखा टेस्टी इडली-सांबार खा
2) त्यात वेलची पावडर घाला. सुगंधासाठी त्यात केसर घाला. एकदम पातळ पाक तयार करा. या पाकात अर्धा कप गुलाबपाणी घाला. यामुळे गुलाबजामला चांगली चव येईल.
3) १ कप रवा मिक्सरमधून बारीक करून घ्या. जर तुम्ही रवा व्यवस्थित बारीक करून घेतला नाही तर गुलाबजामून सॉफ्ट न होता दाणेदार होतील.
4) नंतर अर्धा लिटर दूधात ३ टेबलस्पून साजूक तूप घाला. जेणेकरून गुलाबजामूनला चांगले टेक्चर येईल. दूधात हळूहळू रव्याचे बारीक केलेल मिश्रण घाला. यात अर्धा कप मैदा घाला. फ्लेवरसाठी तुम्ही या मिश्रणात गुलाबपाणी मिसळा. नंतर गॅस ऑन करून हे मिश्रण ढवळत ढवळून शिजवून घ्या.
5) रवा -मैदा व्यवस्थित फुलेपर्यंत ढवळून घ्या नंतर गॅस बंद करा. रवा-मैद्याचा गोळा घट्ट झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या. हा गोळा गरम असतानाच तुपाचा हात लावून व्यवस्थित मळून घ्या आणि त्याचे लहान लहान गोळे तयार करा.
6) गरम तेलात गुलाब जाम तळून घ्या. गुलाबजाम तळताना मंच आच ठेवा. जास्त आचेवर गुलाबजामून फुटू शकतात. सगळे गुलाबजाम एकत्र न घालता हळूहळू घाला.
कोण म्हणतं पोट सुटलं की कमी होत नाही? स्वयंपाकघरातला १ पदार्थ खा-झरझर घटेल चरबी
7) चमच्याने गुलाबजामवर गरम तेल घालू शकता. गरम गरम गुलाबजाम एका ताटात काढून घ्या. पाक पूर्ण थंड झाल्यानंतर त्यात गुलाबजाम घाला. गुलाबजाम खाल्ल्यानंतर तुम्हाला रव्याची टेस्ट अजिबात येणार नाही. माव्याच्या गुलाबजाम प्रमाणे मऊ लागतील.