सकाळच्या नाश्त्याला उपमा (Suji Upma) खायला अनेकांना आवडतं. रव्याचा चटपटीत, तिखट उपमा अनेकांचा फेव्हरीट असतो. रव्याचा उपमा नाश्त्याला बनवणं खूपच सोपं आहे ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यास मदत होते याशिवाय हा एक टेस्टी नाश्ता आहे. (Easy Breakfast Recipe) रव्याचा परफेक्ट उपमा करण्यासाठी तुम्ही काही बेसिक कुकींग टिप्स फॉलो करू शकता. रव्याचा उपमा खाल्ल्यानं तोंडाला एक वेगळीच नवीन चव येते आणि खायलाही चांगला लागतो. उपमा करण्याची रेसिपीसुद्धा अगदी सोपी, सहज जमेल अशी आहे. (Rava Upma Recipe in Marathi Suji Upma)
रव्याचा उपमा करण्यासाठी लागणारं साहित्य
१) रवा- १ कप२) पाणी- २.५ कप३) तेल २ ते ३ चमचे४) मोहोरी- दीड चमचे५) उडीदाची डाळ - १ चमचा६) चण्याची डाळ- १ चमचा७) कढीपत्ता - २ ते ३८) बारीक चिरलेला कांदा - १९) बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या- २१०) आल्याचा तुकडा - १ इंच११) बारीक चिरलेला गाजर - १/४ कप१२) मटार - १/४ कप१३) बारीक चिरलेली कोथिंबीर - २ मोठे चमचे१४) मीठ- चवीनुसार१५) नमक - स्वादानुसार१६) गरम मसाला - १/४ चमचे१७) लिंबाचा रस - १ चमचा
रव्याचा उपमा करण्याची योग्य पद्धत ( Rava Upma Recipe)
1) रव्याचा उपमा बनवणं खूप सोपं आहे काही मिनिटांत हा पदार्थ बनून तयार होतो. सगळ्यात आधी एक नॉनस्टिक कढई घ्या आणि त्यात रवा घालून मध्यम आचेवर भाजत राहा. रव्याचा रंग हलका गोल्डन होत नाही तोपर्यंत रवा भाजत राहा.
लेक १२ वर्षांची होताच प्रत्येक आईबाबांनी शिकवायला हव्यात ५ गोष्टी; मुलगी होईल यशस्वी-खंबीर
2) आता दुसऱ्या कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहोरी, उडीदाची डाळ, चण्याची डाळ घाला काहीवेळानंतर कढीपत्ता, कांदा, मिरची आणि आलं घालून परतवून घ्या.
3) कांदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यात गाजराचे काप आणि मटार घालून काहीवेळ शिजू द्या. परतवून घेतलेल्या या पदार्थांमध्ये रवा घालून व्यवस्थित एकजीव करा. रवा घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने कांदा आणि भाज्यांच्या मिश्रणात रवा एकजीव करा. हळूहळू गरम पाणी घालून रवा घोटून घ्या.
दातांवर चिकट-पिवळा थर आला? रोज हे १ पान चावून खा; मोत्यासारखे चमकतील दात-दुर्गंधही येणार नाही
4) यात मीठ, हळद, गरम मसाला घालून मध्यम आचेवर कढईवर झाकण ठेवून शिजवून घ्या. तयार आहे चव आणि पोषणानं परिपूर्ण असा रव्याचा उपमा हा उपमा तुम्ही सर्विंग बाऊलमध्ये काढू शकता. यावर लिंबाचा रस घाला आणि कोथिंबीर घालून गार्निश करा.