थोड्याच दिवसांत सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पा येणार म्हणून प्रत्येक घरात सगळ्यांचीच लगबग सुरु आहे. गणपती येण्याआधी आपण सगळेच अगदी जय्यत तयार करुन त्याचा स्वागताला सज्ज असतो. गणपतीत आपण प्रसादासाठी अनेक गोडाधोडाचे पदार्थ आवर्जून तयार करतो. गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांत आपण गणपती बाप्पाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवतो. गणपती बाप्पाला प्रसाद म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर मोदकांशिवाय दुसरं काहीच येत नाही(Sunthwada Recipe).
मोदकांमध्ये देखील आपण उकडीचे, तळणीचे, खव्याचे अशा अनेक प्रकारचे मोदक तयार करतो. परंतु काहीवेळा सतत दहा दिवस असे गोडाधोडाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो, त्यातच जर डायबिटीस असेल तर गोड खाण्यांवर बरीच बंधने येतात. अशावेळी बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच प्रसादासाठी थोडं वेगळं काहीतरी करायचं असेल तर आपण सुंठवडा देखील करु शकतो. सुंठवडा करायला देखील अगदी सोपी रेसिपी असून ते खाण्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात. झटपट होणारा आणि २ ते ३ दिवस छान टिकणारा हा सुंठवडा कसा करायचा ते पाहूयात(How To Make Sunthwada At Home).
साहित्य :-
१. सुंठ - १ कप
२. खारीक - १/२ कप
३. काजू - १० ते १२
४. बदाम - १० ते १२
५. बडीशेप - १ टेबलस्पून
६. तीळ - १ टेबलस्पून
७. खसखस - १ टेबलस्पून
८. धणे - १ टेबलस्पून
९. वेलची पूड - १ टेबलस्पून
१०. साखर - २ टेबलस्पून
११. सुकं खोबर - १/२ कप
१२. मनुके - १० ते १२
सोयाबीन कबाब खाऊन तर पाहा, मुलांच्या डब्यासाठी प्रोटीनपॅक रेसिपी-हॉटेलच्या कबाबांपेक्षा भारी...
घरच्याघरी विकतसारखे पॉपकॉर्न करा १ मिनिटांत, कुकरचीही गरज नाही- पाहा ही भन्नाट ट्रिक...
कृती :-
१. सुंठ घेऊन ते खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये थोडे जाडसर भरड होईपर्यंत बारीक करून घ्यावे. आता ही सुंठ पावडर एका वेगळ्या बाऊलमध्ये काढू घ्यावी.
२. एक पॅन घेऊन त्या पॅनमध्ये, खारीकचे लहान तुकडे करुन ते खरपूस भाजून घ्यावेत. त्यानंतर काजू, बदाम, बडीशेप, तीळ, खसखस, धणे असे सगळे जिन्नस कोरडे भाजून घ्यावेत. त्यानंतर हे सगळे जिन्नस एका वेगळ्या डिशमध्ये काढून ते गार होण्यासाठी ठेवून द्यावेत.
४. सगळे जिन्नस गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात सुंठ पावडर, भाजलेल्या खारीकचे लहान तुकडे, वेलची पूड, साखर, काजू, बदाम घालून त्याची बारीक पूड होईपर्यंत व्यवस्थित बारीक करून घ्यावे.
५. आता सुक्या खोबऱ्याचा किस करुन तो किस ४ ते ५ मिनिटे कोरडा हलकाच भाजून घ्यावा. आता हे भाजलेल सुकं खोबरं एका डिशमध्ये काढून त्यात मिक्सरमधील बारीक वाटून घेतलेले मिश्रण घालून सगळे जिन्नस चमच्याने ढवळून मिक्स करुन घ्यावे. त्यावर आपल्या आवडीप्रमाणे थोडे मनुके भुरभुरवून घ्यावेत.
सुंठवडा खाण्यासाठी तयार आहे. हा सुंठवडा आपण एका काचेच्या हवाबंद बाटलीत स्टोअर करुन ठेवल्यास तो किमान आठवडाभर तरी चांगला राहतो.
सुंठवडा खाण्याचे आरोग्यदायी फायदे...
१. सुंठवडा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ अतिशय पौष्टिक असतात. यात व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स, फायबर यांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणांत असते.
२. केस, हाडांचे आजार, पोटाचे विकार, पचनक्रियेच्या समस्या, सांधेदुखी अशा आरोग्याच्या अनेक समस्यांवर सुंठवडा खाणे फायदेशीर ठरते.
३. पोटावर चरबी साठू नये म्हणून सुंठ फायदेशीर ठरते. इतकेच नाही तर हृदयविकार, डायबिटीस यांसारख्या विकारांचा त्रास होऊ नये म्हणून सुंठवडा खाणे उपयुक्त ठरते.