उत्तम, गोल चपात्या करणं कोणत्याही कलेपेक्षा कमी नसेत. अनेक भारतीय घरांमध्ये लोकाना चांगला स्वंयपाक करता येत नाही. (Tricks And Tips To Make Fluffy Chapati) गोल, मऊ चपात्या करणं अनेकांना आवडतंच असं नाही. (Chapati Making Tips) सॉफ्ट चपाती बनवण्यासाठी डाळी, भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. जर चपाती वातडी असेल तर खाण्याचा पूर्ण आनंद घेता येत नाही. (Cooking Hacks) मऊसूत, चपात्या करण्यासाठी काही सोपे हॅक्स ट्राय करायला हवेत ज्यामुळे चपात्या अगदी उत्तम बनतील. (How To Make Soft Rotis)
चपात्या कडक का होतात? (Why Chapati Become Hard)
पीठ मळताना जास्त पाण्याचा वपर केला तर त्यातील मॉईश्चरचे प्रमाण कमी झाल्यामुळे चपात्या कडक बनतात. इतकंच नाही तर पीठ मिळताना सुकं पीठ लावल्याने त्यातील मॉईश्चरवर याचा परिणाम होतो. ज्यामुळे चपाती कोरडी बनते आणि थोड्यावेळाने कडक होऊ लागते.
पीठ मळताना या गोष्टीची काळजी घ्या (Soft Roti Making Tips)
चपाती जास्तवेळ मऊ राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी घालून मळा. याशिवाय पाणी मिसळण्याआधी पीठ चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या. यामुळे पीठ घट्ट होईल आणि चपात्या मऊ होतील. पीठात थोडं गरम पाणी आणि मीठ मिसळून चपात्या करा. कारण यामुळे पीठ व्यवस्थित फुलेल आणि चपाती जास्तवेळ सॉफ्ट राहील. चपाती सॉफ्ट राहण्यासाठी हे फार महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही पीठ मळता तेव्हा त्यावर थोडं रिफाईन ऑईल, तूप किंवा पाणी लावून १० ते १५ मिनिटं झाकून सेट करायला ठेवा.
चपाती (Chapati) तव्यावर घालण्याआधी त्याचे तापमान तपासून घ्या. लक्ष द्या की तवा जास्त गरम नसेल कारण तवा जास्त गरम असेल तर चपाती त्यावर ठेवल्यानंतर लगेचच चिकटू लागेल आणि फुगणार नाही. चपाती मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजवून घ्या. जेणेकरून चपाती व्यवस्थित फुलेल. फुललेली चपाती जास्तवेळ मऊ राहते, तेलाऐवजी तूपाचा वापर करू शकता. ज्यामुळे पीठ मऊ राहतं आणि चपाती आरोग्यासाठी उत्तम ठरते. चपात्या मऊ राहण्यासाठी अर्धा चमचा तूप पुरेसं ठरतं.
चपात्या शेकल्यानंतर काळ्या होत असतील तर तुम्ही चपातीवर लागलेलं एक्स्ट्रा सुकं पीठ काढून टाका. चपाती जास्तवेळ आधी बनवून ठेवलेली नसावी. चपाती मऊ राहण्यासाठी पीठ व्यवस्थित गाळून घ्या. जर पीठ व्यवस्थित गाळलं नसेल तर चपात्या कडक बनतात. पीठ मळताना नेहमी हळू हळू पाणी घाला. एकत्र पाणी घातल्यामुळे पीठ पातळ होऊ शकतं. पीठ मळताना त्यात तूप घालायला विसरू नका नंतर पीठ घालून ठेवा.