Join us  

नारळाची बर्फी- लाडू-नारळी भातही खाल्ला असेलच, आता करा नारळाची गोड पोळी? बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2022 8:17 AM

गणपती उत्सवात आपण बाप्पासाठी वेगवेगळे पदार्थ शोधत असतो. नारळाचा वेगळा पदार्थ (coconut recipe) म्हणून प्रसादाला नारळाची पोळी (sweet coconut poli) नक्की करता येईल. केवळ बाप्पासाठीच नाहीतर लहान मुलांना पौष्टिक खाऊ म्हणून तो डब्यालाही देता येईल.

ठळक मुद्देसाखर ही खोवलेल्या नारळात घालू नये नाहीतर सारणाला पाणी सुटेल. साखर कणिक मळताना कणकेतच घालावी.नारळाच्या पोळीसाठी कणिक दुधानं मळावी. 

नारळाचे गोड पदार्थ म्हणून नारळाची बर्फी, लाडू, भात असे प्रकार आपण बऱ्याचदा केलेले आहेत. पण नारळाची गोड पोळी  ( sweet coconut poliसुध्दा करता येते हे माहित आहे का? गणपती उत्सवात आपण बाप्पासाठी वेगवेगळे पदार्थ शोधत असतो. नारळाचा वेगळा पदार्थ म्हणून प्रसादाला नारळाची पोळी (how to make coconut poli)  नक्की करता येईल. केवळ बाप्पासाठीच नाहीतर लहान मुलांना पौष्टिक खाऊ (nutritious recipe of coconut)  म्हणून तो डब्यालाही देता येईल. सकाळच्या नाश्त्याला नेहमीच्या पदार्थांना वेगळा आणि पौष्टिक पर्याय म्हणूनही नारळाची पोळी करता येते. 

Image: Google

कशी करावी नारळाची पोळी?

नारळाची पोळी करण्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ, पाऊन कप ओलं खोबरं, 15-20 बदाम, वेलचीपूड, 2-3 मोठे चमचे साजूक तूप. 2 चमचे पांढरे तीळ, थोडं मीठ, अर्धा कप साखर आणि 1 कप दूध घ्यावं. नारळाची पोळी करताना एका खोलगट भांड्यात कणिक घ्यावी. त्यात मीठ, साखर, 1 छोटा चमचा साजूक तूप आणि कोमट दूध घालून कणिक मऊसर मळून घ्यावी. साखर ही कणकेत घालूनच मळावी. ती खोवलेल्या खोबऱ्यात घातल्यास सारणाला पाणी सुटतं.

Image: Google

कणिक मळून 20 - 25 मिनिटं झाकून मुरु द्यावी. बदाम मिक्सरमधून वाटून् घ्यावेत. पोळीमध्ये नारळाचं सारण भरण्यासाठी खोबरं खोवून घ्यावं. त्यात तीळ, वाटलेले बदाम आणि वेलची पूड घालून सारण चांगलं हलवून घ्यावं. नारळाची पोळी करण्यासाठी मुरलेल्या कणकेची लाटी घ्यावी. ती हातानंच थोडी मोठी करुन घ्यावी. पोळीला थोडं तूप लावावं. तूप लावलं की त्यावर थोडं कोरडी कणिक भुरभुरावी. नंतर 1 ते 2 चमचे सारण घेऊन ते पारीमध्ये भरावं. सारण आत लोटत पारीचं तोंड बंद करुन कोरड्या पिठावर पोळी हलक्या हातानं लाटून घ्यावी. तवा गरम झाला की पोळी तव्यावर टाकून तूप सोड्न दोन्ही बाजुंनी सोनेरी रंगावर खरपूस शेकावी. नारळाची ही पोळी नुसती तूप घालून खाल्ली तरी छान लागते. दह्यासोबत किंवा एखाद्या भाजीसोबत खाल्ली तरी चविष्ट लागते. 

टॅग्स :गणेशोत्सवकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीअन्न