मक्याचे कणीस (Sweet Corn Recipe ) आणि पाऊस यांचे अनोखे नाते आहे. पावसाळ्यात मक्याचा भुट्टा (Corn Appe Recipe) खाण्याची मज्जा काही औरच असते. मस्त गरमागरम खरपूस भाजून घेतलेला मका आणि त्यावर लिंबू पिळून मीठ - मसाला लावल्यानंतर तो खायला आणखीनच छान लागतो. मक्याचे कणीस खायला जसे चवदार आहे तसेच आपल्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर असते. पावसाळा आला की असाल खवय्यांना विविध पदार्थ खाण्याचे वेध लागतात. अनेक प्रकारच्या चविष्ट पदार्थांवर अतिशय आवडीने ताव मारला जातो. पावसाळ्यात गरमागरम, मसालेदार पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात(How To Make Sweet Corn Appe).
तळलेली भजी, बटाटा वडा, विविध प्रकारचे चाट असे अनेक मसालेदार पदार्थ मुसळधार कोसळणाऱ्या पावसात आपण खातो. पावसाळा हा मक्याच्या कणसाशिवाय अधूराच म्हणावा लागेल. पावसाळ्यात मक्याचे कणीस व त्यापासून तयार झालेले इतर पदार्थ खाल्ले नाही तर नवलच आहे, असे म्हणावे लागेल. भाजलेला मका, मक्याचे चाट, उकडलेला मका ( sweet corn appe recipe) अशा विविध प्रकारचे पदार्थ पावसाळ्याचा आनंद द्विगुणीत करतात. यंदाच्या पावसाळ्यात अशाच मक्याच्या दाण्यांपासून झटपट होणारे मक्याचे आप्पे नक्की ट्राय करा. मक्याचे आप्पे तयार करण्याची सोपी रेसिपी(Sweet corn Appe).
साहित्य :-
१. मक्याचे दाणे - २ कप
२. लसूण - १ टेबलस्पून
३. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरुन घेतलेल्या)
४. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
५. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
६. जिरे - १ टेबलस्पून
७. हळद - १ टेबलस्पून
८. मिरची पावडर - १ टेबलस्पून
९. मीठ - चवीनुसार
१०. बेसन - १/२ कप
११. तांदळाचे पीठ - १/२ कप
१२. तेल - गरजेनुसार
१३. पाणी - गरजेनुसार
फक्त १५ मिनिटांत करा उडूपी पेपर डोसा घरच्याघरी, कुरकुरीत- पातळ पेपर डोशाची सोपी रेसिपी...
मूगडाळ-पनीर चिला म्हणे जान्हवी कपूरला आवडतो फार, पाहा आपल्या पारंपरिक धिरड्याचाच नवा प्रकार...
कृती :-
१. मिक्सरच्या भांड्यात थोडे मक्याचे दाणे घेऊन त्याची पातळ पेस्ट करुन घ्यावी. यातच थोडे मक्याचे दाणे घालावेत.
२. त्यातच बारीक चिरुन घेतलेला लसूण व हिरव्या मिरच्या घालाव्यात. त्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालावी.
३. आता या मिश्रणात जिरे, हळद, मिरची पावडर तसेच चवीनुसार मीठ घालून घ्यावे.
४. हे बॅटर बाइंडिंगसाठी यात बेसन व तांदुळाचे पीठ घालावे.
५. सगळ्यांत शेवटी या मिश्रणात किंचितसे पाणी घालूंन हे सगळे मिश्रण चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे.
६. आता आप्पे पात्रात तेल सोडून मग हे बॅटर चमच्याने घालावे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावे.
७. आप्पे दोन्ही बाजुंनी हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत शिजवून घ्यावे.
आपले कॉर्न आप्पे खाण्यासाठी तयार आहेत. हिरव्या चटणीसोबत हे गरमागरम कॉर्न आप्पे खाण्यासाठी सर्व्ह करावेत.