Join us  

नाश्त्यासाठी करा स्वीटकॉर्न पराठा! खमंग, कुरकुरीत- मुलांना डब्यात देण्यासाठी उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2023 12:43 PM

How To Make Sweet Corn Paratha?: स्वीटकाॅर्नचा पराठा नाश्त्यासाठी तसेच मुलांना डब्यात देण्यासाठी एक अतिशय चांगला पदार्थ आहे (corn paratha for tiffin), एकदा करून पाहा...

ठळक मुद्देअगदी कमीतकमी साहित्य वापरून खमंग स्वीटकॉर्न पराठा कसा करायचा ते आता पाहूया...

सध्या स्वीटकॉर्नचा हंगाम आहे. त्यामुळे बाजारात भरपूर प्रमाणात स्वीटकॉर्न आलेले आहेत. हे स्वीटकॉर्न आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतींनी खातो. कधी उकडून खातो, तर कधी कणिस गॅसवर भाजून गरमागरम खातो. कॉर्न भजी हा देखील अनेकांचा आवडीचा पदार्थ. आता यावेळी मात्र स्वीटकॉर्नचे पराठे करून पाहा (Corn paratha recipe). ही रेसिपी अतिशय सोपी तर आहेच शिवाय खूप पौष्टिकही आहे (easy and tasty recipe for breakfast). नाश्त्यासाठी हा पदार्थ करू शकता किंवा मग मुलांना डब्यात देण्यासाठीही अगदी उत्तम आहे (sweet corn paratha for tiffin). अगदी कमीतकमी साहित्य वापरून खमंग स्वीटकॉर्न पराठा कसा करायचा ते आता पाहूया...(easy recipe of corn paratha)

 

स्वीटकॉर्न पराठा करण्याची रेसिपी

साहित्य

स्वीटकॉर्नचे २ ते ३ कणिस

१ टीस्पून आलं- लसूण पेस्ट

१ टीस्पून हिरव्या मिरचीचे वाटण

मैत्रिणीच्या लग्नासाठी आलिया भटने घातला ५२ हजारांचा सुंदर ड्रेस, त्यावरची नक्षी अशी की.... बघा व्हायरल फोटो

२ टेबलस्पून कोथिंबीर

२ मध्यम आकाराचे कांदे

वाटीभर कणिक आणि ज्वारीचे पीठ. ज्वारीचे पीठ नसल्यास फक्त कणिक घातली तरी चालेल.

चिमूटभर हळद

चवीनुसार मीठ

१ टीस्पून तिखट आणि १ टीस्पून गरम मसाला.

 

कृती 

सगळ्यात आधी स्वीटकॉर्न आणि कांदा एका भांड्यात किसून घ्या.

त्यानंतर त्यात आलं- लसूण पेस्ट आणि मीठ टाका. हे मिश्रण अर्धा तास तसंच झाकूण ठेवा. 

कित्येक वर्षांपासून जुनाच तिखट- मीठाचा डबा वापरता? करा थोडासा बदल- बघा ३ सुंदर आकर्षक पर्याय...

अर्ध्यातासाने किसून ठेवलेल्या कांद्याला आणि स्वीटकॉर्नला पाणी सुटलेलं असेल. या पाण्यात आता जेवढी मावेल तेवढीच कणिक टाका. कणिक जास्त असेल आणि कोरडी वाटत असेल तर ती भिजवण्यासाठी त्यात पाण्याऐवजी दही किंवा ताक टाका. 

वजन भराभर कमी करायचंय? मग 'ही' फळं अगदी आतापासूनच दररोज खा, झर्रकन उतरेल वजन

यानंतर तिखट, मीठ, मसाला, मिरच्या, काेथिंबीर, हळद टाकून पीठ मळून घ्या.

त्यानंतर लाटण्याने लाटून त्याचे पराठे करा आणि तूप लावून तव्यावर खमंग भाजून घ्या. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीलहान मुलं