Join us  

पावसाळ्यात करा मक्याचा ढोकळा, भुट्टा खाण्याची चटपटीत मजा - करा मस्त हलका जाळीदार ढोकळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 7:56 PM

How To Make Sweet Corn Rava Dhokla : पाऊस म्हटल की मक्याचं कणीस तर हवंच, पण याच मक्यापासून झटपट तयार होणारा स्पॉंजी, लुसलुशीत, जाळीदार ढोकळा खाण्याची मज्जा काही औरच असते...

एखादे निसर्गरम्य ठिकाण, भुरभुरणारा पाऊस आणि त्यांच्या जोडीला गरमागरम भुट्टा म्हणजे मक्याचं कणीस... असे चित्र आपल्याकडे नेहमीच दिसून येते. आपल्याकडील पावसाळा हा मक्याच्या कणसाशिवाय अधूराच म्हणावा लागेल. पावसाळ्याच्या दिवसात मक्याचे दाणे खाण्याचा आनंदच काही वेगळा असतो. तिखट-मीठ आणि लिंबू पिळलेला मका पाहिल्यानंतर ते खाण्याचा मोह आवरला जात नाही.

 भाजलेलं मक्याचे कणीस, उकडलेला मका हे आपण आवडीने खातो. मका अत्यंत पौष्टीक असून त्यात फायबर्स अधिक प्रमाणात असतात. नाश्त्यामध्ये अनेक वेळा आपण मक्यापासून तयार करण्यात आलेले विविध पदार्थ खातो. आपल्याकडे कॉर्न पॅटिस, कॉर्न सूप, कॉर्न भेळ, कॉर्न पुलाव असे वेगवेगळे पदार्थ कॉर्न पासून तयार केले जातात. सध्या बाजारात असणारी हिरवट-पिवळसर सालं असलेली मक्याची कणसं अनेकांची लक्ष वेधून घेतात. या मक्याच्या कणसापासून आपण छान कॉर्न रवा ढोकळा घरच्या घरी झटपट बनवू शकतो. खिडकीतून बाहेर बरसणाऱ्या पावसाची मज्जा घेत घेत आपण हा गरमागरम ढोकळा खाण्याचा आनंद लुटू शकतो. कॉर्न रवा ढोकळा तयार करण्याची झटपट रेसिपी पाहूयात(How To Make Sweet Corn Rava Dhokla At Home).

साहित्य :- 

१. बारीक रवा - ३/४ कप २. दही - १/२ कप ३. पाणी - १/२ कप ४. हिरव्या मिरचीची पेस्ट - १/२ टेबलस्पून ५. हळद - १ टेबलस्पून ६. हिंग - १/२ टेबलस्पून ७. तेल - १ टेबलस्पून ८. मीठ - चवीनुसार ९. उकडवून घेतलेले मक्याचे दाणे - १/२ कप (मक्याचे दाणे उकडवून किंचित मिक्सरला फिरवून बारीक करुन घ्यावेत.)१०. फ्रुट सॉल्ट - १/२ टेबलस्पून 

घरच्याघरी करा परफेक्ट ढोकळा प्रिमिक्स, १० मिनिटांत लुसलुशीत ढोकळा तयार ! पीठ टिकते ६ महिने...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये, बारीक रवा ओतून घ्यावा मग त्यात दही व गरजेनुसार पाणी घालावे, हे मिश्रण चमच्याने ढवळून घ्यावे. २. आता या मिश्रणात हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, हिंग, तेल, मीठ घालून सगळे मिश्रण ढवळून एकजीव करून घ्यावे. ३. त्यानंतर हे तयार मिश्रण ५ मिनिटे झाकून ठेवावे. ४. ५ मिनिटांनंतर या ढोकळ्याच्या मिश्रणात उकडवून किंचित मिक्सरला फिरवून बारीक करुन घेतलेले मक्याचे दाणे घालावेत. 

ढोकळा हवा तसा मनासारखा फुलून येत नाही ? सोडा घालण्याची पद्धत तर चुकत नाही ना...

आता चिकाच्या दुधाशिवाय बनवा तितक्याच सुंदर चवीचा खरवस...खरवसाची जिभेवर रेंगाळणारी चव...

५. चमच्याने ढळवून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणात फ्रुट सॉल्ट घालून मिश्रण ढवळून एकजीव करून घ्यावे. ६. आता एक प्लेन डिश घेऊन त्या डिशला तेल लावून मग त्यात हे ढोकळ्याचे बॅटर ओतावे, किंवा जर आपल्याकडे छोट्या छोट्या वेगवेगळ्या आकाराच्या वाट्या असतील तर त्याला तेल लावून मग हे बॅटर त्यात ओतावे. ७. त्यानंतर हा ढोकळा वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये किंवा कुकरमध्ये ठेवून द्यावा. १० ते १५ मिनिटे हा ढोकळा कुकरमध्ये वाफवून घ्यावा. ८. ढोकळा वाफवून झाल्यानंतर तो कुकरमधून काढून त्याचे काप पडून घ्यावेत किंवा मोल्डमध्ये ठेवले असल्यास ते काढून घ्यावेत. 

कॉर्न रवा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. हा ढोकळा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.

टॅग्स :अन्नपाककृती