Lokmat Sakhi >Food > श्रावण सोमवार स्पेशल : उपवासाला करुन पाहा रताळ्याचे हेल्दी चाट, अतिशय पौष्टिक झटपट पदार्थ - पचायलाही हलका...

श्रावण सोमवार स्पेशल : उपवासाला करुन पाहा रताळ्याचे हेल्दी चाट, अतिशय पौष्टिक झटपट पदार्थ - पचायलाही हलका...

Sweet Potato Chaat Recipe for Fasting : श्रावणात उपवासाला नेहमीचे अपचन करणारे पदार्थ नको, खाऊन पाहा हा साधासोपा पौष्टिक पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2023 11:30 AM2023-08-21T11:30:01+5:302023-08-21T11:54:13+5:30

Sweet Potato Chaat Recipe for Fasting : श्रावणात उपवासाला नेहमीचे अपचन करणारे पदार्थ नको, खाऊन पाहा हा साधासोपा पौष्टिक पदार्थ

How To Make Sweet Potato Chaat For Fasting. | श्रावण सोमवार स्पेशल : उपवासाला करुन पाहा रताळ्याचे हेल्दी चाट, अतिशय पौष्टिक झटपट पदार्थ - पचायलाही हलका...

श्रावण सोमवार स्पेशल : उपवासाला करुन पाहा रताळ्याचे हेल्दी चाट, अतिशय पौष्टिक झटपट पदार्थ - पचायलाही हलका...

श्रावण म्हटलं की आपल्याकडे सणांची सुरुवात होते. श्रावण महिन्यात एका पाटोपाट एक सण येतच राहतात. या सणांसोबतच श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार व श्रावणी शनिवार यांना विशेष महत्व असते. श्रावण महिन्यांत येणाऱ्या सणांबरोबरच उपवास हे ओघानेच आले. आपल्यापैकी बरेचजण श्रावण महिन्यात येणाऱ्या विविध सणांना व श्रावणी सोमवार व शनिवार या दिवशी आवर्जून उपवास करतात. 

श्रावणातील सण - समारंभ, उपवास म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्याची चंगळच असते. 'उपवासा दिवशी दुप्पट खाशी' अशी म्हण आपल्याकडे अतिशय प्रचलित आहे. आपल्यापैकी बरेचजण उपवासाच्या नावाखाली सणवाराला घरात तयार होणाऱ्या उपवासाच्या पदार्थांवर ताव मारतात. उपवासाचे नाव घेतले की आपल्याला सर्वात पहिल्यांदा आठवतात ते साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी, रताळ्याचा किस, बटाट्याचे वेफर्स, साबुदाण्याची मिसळ, फराळी पॅटिस, उपवासाचे थालीपीठ. उपवासाचे असे असंख्य पदार्थ आपण घरीच बनवून खातो. असे असले तरीही काहीवेळा आपल्याला तेच ते साबुदाणा, बटाट्यापासून तयार केलेले उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी उपवासाचे वेगळे खाण्याची इच्छा होते. यंदाच्या श्रावणात झटपट घरच्या घरी होणारे उपवासाचे चाट नक्की ट्राय करून पहा( How To Make Sweet Potato Chaat For Fasting).

साहित्य :- 

१. रताळे - १ किंवा २ 
२. शेंगदाण्याचा कूट - १ ते २ टेबलस्पून 
३. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 
४. मीठ - चवीनुसार 
५. काळं मीठ - चवीनुसार 
६. लाल तिखट मसाला - चिमूटभर 
७. जिरेपूड - १/२ टेबलस्पून 
८. दही - १ कप 

नागपंचमी विशेष : यंदा करा कोकणातल्या पारंपरिक, अत्यंत सुगंधी हळदीच्या पानातील पातोळ्या, ही अद्भुत चव तुम्ही विसरूच शकत नाही...

कृती :- 

१. सर्वप्रथम रताळे स्वच्छ धुवून ते सालीसकट वाफवून किंवा उकडून घ्यावे. 
२. रताळे वाफवून झाल्यावर त्याची साल काढून घेऊन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. 

करुन पाहा वांग्यांचं रायतं; वांग्याचं भरीत आणि वांग्याची कापं विसराल असा मस्त चमचमीत पदार्थ...

फक्त १० मिनिटांत फ्रिजमध्ये करून ठेवा ४ प्रकारची वाटणं, रोजचा स्वयंपाक होईल चमचमीत - झटपट...

३. हे रताळ्याचे तुकडे एका बाऊलमध्ये घेऊन त्यावर लिंबाचा रस, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ व काळं मीठ, लाल तिखट मसाला, जिरेपूड घालून चमच्याने ढवळून हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यावे. 
४. सर्वात शेवटी यात दही घालून चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यावे. 

आपले उपवासाचे झटपट तयार होणारे रताळ्याचे चाट खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: How To Make Sweet Potato Chaat For Fasting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.