Join us  

झटपट करा चिंचेची आंबट-गोड चटणी; सोपी रेसिपी-पाणीपुरीच्या गाड्यांवर मिळते तशी बनेल चटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 9:23 AM

How to Make Tamarind Chutney : चिंचेची चटणी  बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. चिंचेची चटणी करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही.

जेवताना तोंडी लावणासाठी किंवा भेळ, दही वडा, शेवपूरी या पदार्थांमध्ये घालण्यासाठी  चिंचेची चटणी हा सगळ्यात मस्त पर्याय आहे. चिंचेची चटणी ही चवीला भारी तितकीच करायलाही सोपी आहे. (Tamarind Chutney Recipe) चिंचेची चटणी  बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. चिंचेची चटणी करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. फक्त सोप्या २ ते ३ स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. (How to make tamarind chutney)

चिंचेच्या चटणीसाठी लागणारं साहित्य

१) चिंच-  २ ते ३ वाटी

२) पाणी- एक ते दीड ग्लास

३)  लाल तिखट- १ ते  दीड चमचा

४) जीरं-  १ ते  २ चमचे, जीरं पावडर- १ ते २ चमचे

५) गूळ-  एक कप

६) साखर- अर्धा कप

७) काळं मीठ- चवीनुसार

८) हिंग- १  चमचा

९) बडिशेप- १ चमचा

१०) तेल- फोडणीकरीता

कृती

१) चिंचेची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये चिंच काढून घ्या. चिंच पाण्याच व्यवस्थित बुडतील इतकं गरम पाणी घाला. गरम पाण्यामुळे चिंच मऊ होईल.

कुकरमधून वरण बाहेर येतं-गॅस्केट लूज झालंय? 5 टिप्स, प्रेशर नीट तयार होईल-अन्न शिजेल पटापट

२)पाणी घातल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने चिंच व्यवस्थित मॅश करून घ्या. आणि थोडावेळ तसंच भिजवण्यासाठी ठेवा. अर्धा तास चिंच भिजल्यानंतर पुन्हा हाताने कुस्करून घ्या चिंचेचं पाणी पूर्ण घट्ट होईपर्यंत व्यवस्थित कुस्करा. त्यानंतर मोठ्या गाळणीत चिंचेचं मिश्रण घालून पाणी आणि चिंचेचा कोळ वेगळा करून घ्या. 

३) नंतर एका कढईत तेल घालून त्यात जीरं, बडीशेप, हिंग, लाल तिखट घाला.  त्यात चिंचेचं पाणी घाला. त्यात काळं मीठ आणि भाजलेली जीरं पावडर घाला. नंतर त्यात गुळ आणि साखर घाला. जर तुम्हाला फक्त गूळ घालायचा असेल तर तुम्ही साखर नाही घातली तरी चालू शकेल.

इडलीचं पीठ भरपूर फुलेल; डाळ-तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ घाला; मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

४) या मिश्रणाला उकळी फुटल्यानंतर गॅस बंद करा आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवून घ्या. तयार आहे गरमागरम चिंचेची चटणी. ही चटणी तुम्ही चपाती, भाकरी किंवा इतर कशाही बरोबर खाऊ शकता. जर तुम्ही दही वडे किंवा पाणी पुरी, शेव पुरी बनवत असाल तर त्यासाठी या चटणीचा वापर करू शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स