पालक, मेथी, चुका अशा टिपिकल पालेभाज्या आपण नेहमीच खातो. पण त्या खाताना कुठेतरी तांदुळसा, माठ अशा रानभाज्यांकडे दुर्लक्ष होते.. पण आरोग्यासाठी जशा आपल्या या नेहमीच्या भाज्या गुणकारी असतात, तशाच या रानभाज्याही खूप खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे अधूनमधून आपल्या या पारंपरिक भाज्या नेहमीच केल्या पाहिजेत.. अशीच एक खास रेसिपी सांगितली आहे अभिनेत्री भाग्यश्री हिने. (tambada math recipe)
भाग्यश्री सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव असते. दर मंगळवारी ती तिच्या चाहत्यांना एक फिटनेस मंत्र देत असते.. कधी ती योगाचे किंवा एखाद्या व्यायामाचे महत्त्व समजावून सांगते तर कधी उत्तम आरोग्यासाठी आहारात कोणते पदार्थ घ्यावेत, ऋतुमानानुसार आहार कसा बदलावा, याच्या टिप्स देते. त्यामुळे भाग्यश्रीच्या tuesday tips जाणून घेण्यासाठी तिचे चाहतेही उत्सूक असतात. आता नुकतीच तिने तांबड्या किंवा लाल माठाची भाजी कशी करायची याची एक रेसिपी शेअर केली असून तांबडा माठ खाण्याचे आरोग्यदायी फायदेही सांगितले आहेत. (How to make 'tambda maath' sabji?)
कशी करायची तांबड्या माठाची भाजी?
- ही भाजी करण्यासाठी भाग्यश्रीने तांबडा माठ, थोडासा पालक, हिरव्या मिरचीचे तुकडे, २ वाळलेल्या लाल मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, हळद, तेल, मोहरी, धने- जीरे पुड असे साहित्य घेतले.
- सगळ्यात आधी तेलाची खमंग फोडणी करून घ्या. फोडणी झाल्यानंतर लसूण, मिरची आणि कांदा टाकून परतून घ्या. त्यानंतर त्यात वाळलेल्या लाल मिरचीचे तुकडे टाका.
- आता कढईत माठ आणि पालक टाका.
- चवीनुसार मीठ आणि धने- जीरे पूड टाकून भाजीला चांगली वाफ येऊ द्या.
- वाफ आली की माठाची खमंग भाजी झाली तयार.
माठाची भाजी खाण्याचे फायदे (benefits of eating tambda maath)
- माठाच्या भाजीत भरपूर फायबर असते, त्यामुळे पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी ही भाजी नियमित खावी.
- माठाच्या भाजीत व्हिटॅमिन्स आणि खनिजे भरपूर असतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे या घटकांची कमतरता जाणवते. त्यामुळे माठाची भाजी आणि पोळी किंवा भाकरी हा उन्हाळ्यातला परफेक्ट आहार आहे.
- व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर असते. त्यामुळे केस आणि डोळ्यांसाठी ही भाजी उत्तम आहे.
- माठाच्या भाजीमध्ये लोह, मँगनीज आणि फोलेटचे देखील योग्य प्रमाण असते.