घावने हा अनेक घरात बनवला जाणारा पदार्थ आहे. कोकण भागात हा पदार्थ आवडीने बनवला जातो.(How to make Tandalache Ghavan) सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत याची चव चाखली जाते.(Traditional Konkani breakfast recipes) हा पारंपरिक पदार्थ तांदळाच्या पिठापासून बनवला जातो. याच्या सोबत ओल्या नारळाच्या चटणीची चव चाखली जाते. (Tandalache Ghavan recipe step by step)
बनवायला सोपा वाटणारा हा पदार्थ तितकाच कठीण आहे. घावने बनवताना त्यांना जाळी पडली नाही की, चव बिघडते.(Soft rice ghavan tips) डोसा आणि घावने यामध्ये बराचसा फरक आहे. योग्य प्रमाणात आणि आवश्यक साहित्यांचा बरोबर वापर केल्यास घावने उत्तम बनतात.(Maharashtrian breakfast ideas) चला तर जाळीदार - मऊ लुसलुशीत घावने कसे तयार करायचे पाहूया. अवघ्या १० मिनिटांत तयार होतील, चव ही उत्तम लागेल. (Authentic Konkani food)
न्यूडल्स करताना चिकट -लगदा होतो? ६ टिप्स, होतील मऊ- सुटसुटीत
साहित्य
तांदळाचे पीठ १ कप
मीठ चवीनुसार
पाणी - २ कप ला थोडे (१ टेबलस्पून)कमी
तेल - घावने भाजण्यासाठी
कृती
1. एका बाउलमध्ये तांदळाचे पीठ, मीठ मिसळून घ्या. त्यात एक कप पाणी हळूहळू घाला. ज्यामुळे गुठळ्या जमणार नाही.
2. फेटून घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाणी घालून मिश्रण पातळ करा. ताकापेक्षा थोड घट्ट् होईल इतकं पीठ घट्ट ठेवा. साधरणत: २ कप पाणी पिठात घालायला हवे.
3. तयार मिश्रण १० मिनिटे झाकूण ठेवा. त्यानंतर तेल लावून तवा गरम करायला ठेवा. टिश्यू पेपर किंवा कांद्याने तेल पुसून घ्या.
4. तवा तापल्यानंतर पीठ तळापासून वाटीने वर खाली करुन घ्या. घावण टाकताना गॅसचा फ्लेम फास्ट असायला हवे.
5. घावण टाकताना आधी ते कडेकडे टाकून मध्यभागी त्याचा शेवट करा. ज्यामुळे जाळी चांगली पडेल.
6. गॅस मंद आचेवर ठेवून त्यावर झाकण अर्धा मिनिटे ठेवा. कडेने तेल किंवा तूप घाला. हळूहळू कडा सुटू लागतील. सुरीने घावनाची कडा तव्यापासून हळूहळू वेगळी करा.
7. घावन उलटे करुन दुसऱ्या बाजूने छान व्यवस्थित भाजून घ्या. तयार होईल छान लुसलुशीत - मऊ जाळीदार घावन