Join us  

आता तंदूरी रोटी खाण्यासाठी ढाब्यावर जायची गरज नाही, घरच्या पॅनवर करा ढाबास्टाईल तंदुरी रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2023 11:49 AM

How to make Tandoori Roti at home on Tawa - No oven No Tandoor Restaurant Style Tandoori Roti Recipe मैदा नाही तर, २ कप गव्ह्याच्या पीठाचे करा ढाबास्टाईल तंदुरी रोटी, चवीला भारी - बनवायला सोपी

भारताची खाद्यसंस्कृती खूप मोठी आहे. विविध राज्यात विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. महाराष्ट्रात चपाती, तर उत्तर भारतात रोटी किंवा नान आवडीने खाल्ले जातात. तर साऊथ इंडियन लोकं चपाती, नान व्यतिरिक्त डोसा आणि इडलीवर ताव मारतात. जेव्हा आपण नॉर्थ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो. तेव्हा आपण पंजाबी स्टाईल पदार्थ जसे की, दाल मखनी, शाही पनीर, त्यासोबत रुमाली रोटी, लच्छा पराठा किंवा नान खातो.

अनेक लोकं तंदूरमध्ये तयार गरमागरम रोट्या खाण्यास प्राधान्य देतात. परंतु, घरी ट्राय केल्यास रोट्या ढाबास्टाईल तयार होत नाही. जर आपल्याला घरी हॉटेलस्टाईल रोट्या तयार करायच्या असतील, तेही भट्टीशिवाय घरगुती पॅनवर, तर ही रेसिपी नक्की फॉलो करून पाहा(How to make Tandoori Roti at home on Tawa - No oven No Tandoor Restaurant Style Tandoori Roti Recipe).

तंदूर रोटी करण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचं पीठ

बेकिंग पावडर

साखर

बेकिंग सोडा

केळी लवकर खराब होऊ नयेत, काळी पडू नयेत म्हणून २ टिप्स, केळी राहतील ताजी

मीठ

दही

तेल

तूप

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ कप गव्हाचं पीठ घ्या. त्यात एक चमचा बेकिंग पावडर, एक चमचा साखर. चिमुटभर बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात ३ टेबलस्पून दही, २ टेबलस्पून तेल व गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर ३५ ते ४० मिनिटांसाठी सुती कापड ठेवा.

१ वाटी चणाडाळीची करा साऊथ इंडियन पद्धतीची चटणी, डोसे - आप्पेसाठी स्पेशल चटणी

३० मिनिटानंतर पुन्हा पीठ मळून घ्या. व पिठाचा गोळा घेऊन चपातीप्रमाणे गोलाकार लाटून घ्या. मात्र, रोटी जास्त पातळ लाटून घेऊ नका. चपातीच्या वरील बाजूस पाण्याचे काही थेंब शिंपडून हाताने पसरवा. दुसरीकडे चपातीचा तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर पाणी लावलेली बाजू खाली ठेवा. जेणेकरून रोटी तव्यावर चिटकेल.

रोटी फुगल्यानंतर तवा उलटा करून गॅसच्या फ्लेमवर शेकून घ्या. रोटी शेकून झाल्यानंतर चमच्याने किंवा ब्रशने एक चमचा तूप लावा. अशा प्रकारे घरच्या घरी ढाबास्टाईल रोटी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स