पावसाळ्यात अळूची पानं कोणत्याही बाजारात मिळतात (Food). अळूची वडी आपण करून खातोच. वडी नाहीतर अळूचं फदफदं किंवा अळूची भाजी खाल्लीच असेल (Cooking Tips). पण आपण कधी अळूची भजी करून पाहिली आहे का? अळूची वडी करण्यात बराच वेळ जातो. शिवाय त्याची प्रोसेस खूप मोठी असते (Kitchen Tips). पण आपण घरातच अळूची भजी काही मिनिटात तयार करू शकता.
नव्या पद्धतीची ही भजी क्वचित कोणी खाल्ली असेल. अळूची भजी चवीला क्रिस्पी लागते. शिवाय १० मिनिटात तयार होते. यासाठी विशेष साहित्यांची गरज लागत नाही. पानं चिरून बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून भजी तळून खाऊ शकता(How To Make Tasty Alu Bhaji in 5 Steps).
अळूची कुरकुरीत भजी करण्यासाठी लागणारं साहित्य
अळूची पानं
बेसन
तांदुळाचं पीठ
हाय बीपीचा त्रास- कधीही चक्कर येते? रोज 'या' फळाचा रस प्या; दीपिका पदुकोणच्या डायटिशियनचा सल्ला
मीठ
लाल तिखट
हळद
ओवा
पाणी
कृती
सर्वात आधी चौकोनी आकारामध्ये अळूची पानं चिरून घ्या. पानं चिरून झाल्यानंतर पाण्याने धुवून घ्या. दुसरीकडे एका बाऊलमध्ये एक कप बेसन घ्या. त्यात २ चमचे तांदुळाचं पीठ, चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल तिखट, चिमुटभर हळद, एक टेबलस्पून ओवा घालून मिक्स करा. थोडं पाणी घाला आणि सरसरीत बॅटर तयार करा.
बसायला जागा मिळवायची म्हणून पाहा महिला कशी चढली गाडीत.. कौतुक करावं की..
दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तेल घाला. बॅटरमध्ये एक - एक पानं बुडवून तेलात सोडून तळून घ्या. तेल गरम झाल्यानंतरच पानं तेलात सोडा. यामुळे भजी कुरकुरीत होतील. अशा प्रकारे अळूची कुरकुरीत भजी खाण्यासाठी रेडी.