Join us  

उरलेल्या पोळ्यांची कुरकुरीत- चटपटीत भेळ, मोठ्या माणसांसह बच्चे कंपनीलाही आवडेल, बघा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2024 1:45 PM

How To Make Tasty Bhel From Leftover Chapatis: उरलेल्या पोळ्यांचं किंवा चपातीचं काय करावं, हा प्रश्न पडला असेल तर ही घ्या भेळ करण्याची एक क्रिस्पी- क्रंची रेसिपी. (crunchy bhel recipe from basi roti)

ठळक मुद्देमुलांना सतत काहीतरी वेगळं आणि टेस्टी खायला पाहिजेच असतं. अशावेळी त्यांना देण्यासाठीही हा पदार्थ अगदी उत्तम आहे. 

बऱ्याचदा असं होतं की आपला अंदाज हुकतो आणि पोळ्या उरतात. उरलेल्या पोळ्यांचं किंवा चपातीचं काय करावं कळत नाही. तोच तो नेहमीचा कुस्कराही सतत खायला नकोच वाटतो. त्यामुळेच आता उरलेल्या पोळ्यांची चटपटीत आणि चवदार भेळ कशी करायची, याची रेसिपी एकदा पाहून घ्या (How to make tasty bhel from leftover chapatis). वयस्कर माणसांपासून ते बच्चे कंपनीपर्यंत सगळ्यांनाच ही भेळ (roti bhel) खूप आवडेल. शिवाय यात सगळ्याच भाज्या टाकून तिला अतिशय पौष्टिकही करू शकता (crunchy bhel recipe from basi roti). संध्याकाळी लागलेली छोटीशी भूक भागविण्यासाठी हा पदार्थ बेस्ट आहे ( Best evening snacks). 

उरलेल्या पोळ्यांची भेळ कशी करायची?

 

साहित्य

उरलेल्या पोळ्या

बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो मिळून अर्धी वाटी

बारीक चिरलेली सिमला मिरची, पत्ता कोबी मिळून अर्धी वाटी

तरुणपणीच गुडघे ठणकतात- कंबर दुखते? हाडांची झीज करणाऱ्या ३ गोष्टी टाळा, हाडं मजबूत होतील

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

१ टीस्पून चाट मसाला

गालिच्यावर खरकटं सांडल्याने खराब झाला? १ सोपा उपाय करा- न धुताही गालिचा होईल स्वच्छ

१ टीस्पून काळं मीठ

चवीनुसार तिखट आणि मीठ

तळण्यासाठी तेल

 

कृती

सगळ्यात आधी पोळ्यांचे काप करून घ्या आणि ते तेलात तळून घ्या. पोळ्या चांगल्या गोल्डन ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत तळून घ्याव्या.

तळून झालेले पोळ्यांचे काप एका भांड्यात एकत्र करा. त्यात तुम्ही चिरलेल्या सगळ्या भाज्या, कोथिंबीर टाका.

कशाला पाहिजे विकतचे महागडे स्क्रब? घरातलेच ५ पदार्थ वापरा- टॅनिंग, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स गायब

चवीनुसार तिखट, मीठ, चाट मसाला, काळं मीठ घाला. 

सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की क्रिस्पी, कुरकुरीत, चटकदार भेळ झाली तयार. 

यात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बारीक शेव आणि मुरमुरेही टाकू शकता. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीलहान मुलं