Lokmat Sakhi >Food > सकाळची उरलेली पोळी-भाजी रात्रीच्या जेवणात नको होते? त्यापासूनच ५ मिनीटांत करा हा भन्नाट टेस्टी पदार्थ

सकाळची उरलेली पोळी-भाजी रात्रीच्या जेवणात नको होते? त्यापासूनच ५ मिनीटांत करा हा भन्नाट टेस्टी पदार्थ

How To Make Tasty Food From Leftover Polibhaji Roti sabji : दुपारचेच रात्री खाण्यापेक्षआ त्याला थोडा ट्विस्ट दिला तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2023 10:44 AM2023-02-26T10:44:23+5:302023-02-26T10:45:40+5:30

How To Make Tasty Food From Leftover Polibhaji Roti sabji : दुपारचेच रात्री खाण्यापेक्षआ त्याला थोडा ट्विस्ट दिला तर..

How To Make Tasty Food From Leftover Polibhaji Roti sabji : Don't want leftovers from the morning for dinner? Make this amazing tasty dish within 5 minutes | सकाळची उरलेली पोळी-भाजी रात्रीच्या जेवणात नको होते? त्यापासूनच ५ मिनीटांत करा हा भन्नाट टेस्टी पदार्थ

सकाळची उरलेली पोळी-भाजी रात्रीच्या जेवणात नको होते? त्यापासूनच ५ मिनीटांत करा हा भन्नाट टेस्टी पदार्थ

सकाळी उठलो की आपण स्वयंपाकाच्या तयारीला लागतो. कणीक मळणे, भाजी चिरणे आणि एकीकडे नाश्त्याची तयारी असं आपलं एकावेळी अनेक आघाड्यांवर काम सुरू असतं. दुपारच्या जेवणाला किंवा डब्याला आपण सगळेच आवर्जून पोळी-भाजी खातो. पण रात्रीच्या जेवणात मात्र परत पोळीभाजी खायचा आपल्याला फार कंटाळा येतो. रात्री गरम वरण-भात किंवा खिचडी नाहीतर वेगळं काहीतरी असलं की आपल्याला ते आनंदाने जातं. पण काही वेळा सकाळी नकळत आपल्याकडून पोळ्या जास्त होतात किंवा दुपारी कोणी जेवले नाही की त्या पोळ्या उरतात. त्यात वाटीभर भाजीही उरलेली असतेच (How To Make Tasty Food From Leftover Polibhaji Roti sabji). 

म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी आणखी एक भाजी आणि भात-वरण असं सगळं करावं लागणार असतं. त्यापेक्षा आहे त्यातच भागेल आणि तरीही छान टेस्टी नवीन पदार्थ तयार होईल असं काही झालं तर? एकीकडे या उरलेल्या पोळ्या वाया घालवून वेगळं काहीतरी करायचं म्हटलं की आपल्या जीवावर येतं. बाहेर मिळते तशी चविष्ट फ्रँकी आपण घरी क्वचितच ट्राय केलेली असते. पाहूया उरलेल्या पोळी आणि भाजीचाच वापर करुन चटपटीत फ्रॅंकी कशी करायची पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य -

१. पोळ्या - ५-६ 

२. भाजी - वाटीभर

३. पनीर किंवा चीज - वाटीभर 

४. सॉस - अर्धी वाटी 

५. कांदे - २ 

६. चाट मसाला - १ चमचा 

७. तेल किंवा बटर - अर्धी वाटी 

कृती -

१. कांदे पातळ चिरुन तेलात चांगले काळपट होईपर्यंत तळून घ्यावेत.

(Image : Google)
(Image : Google)

२. पोळी पसरुन त्यावर एका सरळ रेषेत भाजी घालावी.

३. त्यावर तळलेला कांदा सगळीकडे पसरुन घालावा. 

४. सॉस आणि चाट मसाला घालावा

५. पनीर असेल तर पनीरचे बारीक क्युब किंवा किसलेले चीज यावर घालावे. 

६. याचा रोल करावा आणि पॅनमध्ये तेल किंवा बटर घालून दोन्ही बाजूने हा रोल चांगला खरपूस भाजून घ्यावा.

७. दाबून कडक करावा आणि ताटलीत काढल्यावर त्याचे सुरीने बारीक तुकडे करावेत.

८. यामध्ये भाजी आणि पोळी आहे हे खाणाऱ्यांच्या लक्षातही येत नाही आणि दोन्ही गोष्टी छान संपतात. 

 

Web Title: How To Make Tasty Food From Leftover Polibhaji Roti sabji : Don't want leftovers from the morning for dinner? Make this amazing tasty dish within 5 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.