Lokmat Sakhi >Food > फक्त 3 पदार्थ आणि चवदार कलाकंद तयार, बघा सोपी- झटपट रेसिपी

फक्त 3 पदार्थ आणि चवदार कलाकंद तयार, बघा सोपी- झटपट रेसिपी

Food And Recipe: दिवाळीत पाहुण्यांसाठी काही खास गोड पदार्थ करायचा असेल आणि तोही अगदी पटापट, तर कलाकंद करण्याची ही एक रेसिपी ( Kalakand recipe) आताच बघून ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 05:24 PM2022-10-22T17:24:43+5:302022-10-22T17:25:07+5:30

Food And Recipe: दिवाळीत पाहुण्यांसाठी काही खास गोड पदार्थ करायचा असेल आणि तोही अगदी पटापट, तर कलाकंद करण्याची ही एक रेसिपी ( Kalakand recipe) आताच बघून ठेवा.

How to make tasty mithai Kalakand? Kalakand recipe using just three ingredients  | फक्त 3 पदार्थ आणि चवदार कलाकंद तयार, बघा सोपी- झटपट रेसिपी

फक्त 3 पदार्थ आणि चवदार कलाकंद तयार, बघा सोपी- झटपट रेसिपी

Highlightsदिवाळीच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी कलाकंद करून ठेवा. रेसिपी अगदी सोपी आहे आणि शिवाय पटकन होणारी आहे.

खवा, पेढे, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ यात दिवाळीच्या काळात भेसळ होतेच. त्यामुळे असा कोणताही पदार्थ सणासुदीच्या काळात विकत आणायला जरा भीती वाटतेच. म्हणूनच ही एक रेसिपी बघून घ्या. कलाकंद हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. एकतर तो जरा कमी गोड असतो आणि दुसरं म्हणजे त्याची चवही जरा वेगळी असते. म्हणूनच दिवाळीच्या (sweets for diwali) दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी कलाकंद (How to make Kalakand) करून ठेवा. रेसिपी अगदी सोपी आहे आणि शिवाय पटकन होणारी आहे. ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या spoonsofdilli या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

 

कसं करायचं कलाकंद?
साहित्य

२ टेबलस्पून मिल्क पावडर

दिवाळीची साफसफाई करायची, खिडक्या पुसायच्या म्हणून बाई पाहा कुठं पोहचल्या.. व्हिडिओ व्हायरल

४०० ग्रॅम कंडेन्स मिल्क

अर्धा किलो पनीर

चवीनुसार विलायची पावडर आणि वरतून टाकायला बदाम, पिस्ते असा सुकामेवा.

 

कृती
१. सगळ्यात आधी एक पॅन गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्क टाका. 

२. मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्क व्यवस्थित हलवून घ्या. त्याचा रंग थोडा बदलू लागला आणि ते थोडं घट्ट झालं की त्यात पनीर क्रश करून टाका.

कतरिना कैफचा दिवाळी लूक व्हायरल, ७० हजारांच्या चमचमत्या लाल साडीमध्ये दिसतेय कमाल

३. हे सगळं मिश्रण पुन्हा व्यवस्थित हलवून घ्या आणि मंद ते मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे शिजू द्या.

४. त्यानंतर त्यात थोडीशी विलायची पावडर टाका. एका ताटाला तुपाचा हात फिरवा आणि हे गरमागरम मिश्रण त्यावर टाकून ते एकसारखं ताटभर पसरवा.

५. आता ताटातलं मिश्रण थोडं थंड झालं की ताट एक ते दोन तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.

६. त्यानंतर कलाकंद छान जमून येईल आणि त्याच्या तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडता येतील. 


 

Web Title: How to make tasty mithai Kalakand? Kalakand recipe using just three ingredients 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.