Lokmat Sakhi >Food > आजी करायची तसे पारंपरिक कुटके करा फक्त ५ मिनिटांत, शिळ्या चपात्यांचा चविष्ट पदार्थ

आजी करायची तसे पारंपरिक कुटके करा फक्त ५ मिनिटांत, शिळ्या चपात्यांचा चविष्ट पदार्थ

How to Make Tasty Snacks Chapatis : उरलेल्या चपात्या फेकून देण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी चविष्ट स्नॅक्स बनवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 09:15 PM2024-07-30T21:15:28+5:302024-07-31T16:03:58+5:30

How to Make Tasty Snacks Chapatis : उरलेल्या चपात्या फेकून देण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी चविष्ट स्नॅक्स बनवू शकता.

How to Make Tasty Snacks From Stale Chapatis in 5 Minutes : Stale Chapati Snacks Recipe | आजी करायची तसे पारंपरिक कुटके करा फक्त ५ मिनिटांत, शिळ्या चपात्यांचा चविष्ट पदार्थ

आजी करायची तसे पारंपरिक कुटके करा फक्त ५ मिनिटांत, शिळ्या चपात्यांचा चविष्ट पदार्थ

चपाती हा सर्वांच्याच रोजच्या जेवणातला पदार्थ आहे. चपात्या मोजून केल्या किंवा अंदाजे केल्या तरी २-३ चपात्या प्रत्येकाच्याच घरी उरतात. (How to Make Tasty Snacks Chapatis)  काहीजण चपातीचे सॅण्डविच, फॅन्सी, रोल बनवतात. तुम्ही घरच्याघरी चविष्ट स्नॅक्स बनवू शकता. चपातीचे कुटके हा पारंपारीक पदार्थ असून अनेक घरांमध्ये बनवला जातो. तुम्हीसुद्धा उरलेल्या चपात्या संपवण्यासाठी हा रेसिपी ट्राय करू शकता. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे.

चपातीचे कुटके करण्यासाठी लागणारं साहित्य

१) उरलेल्या चपात्या- २ ते ३

२) तेल- गरजेनुसार

३) मोहोरी- १ टेबलस्पून

४) कांदा - १ मोठा चिरलेला

५) मीठ- चवीनुसार

६) हळद- पाव टिस्पून

७) लाल तिखट - अर्धा टिस्पून

८) पाणी - गरजेनुसारबेसन- २ चमचे

९) कोथिंबीर-  सजावटीसाठी


चपातीचे कुटके करण्याची सोपी रेसिपी

१) चपातीचे कुटके करण्यासाठी सगळ्यात आधी हाताने चपातीचे बारीक तुकडे करून घ्या. तेलात मोहोरी आणि बारीक चिरलेला कांदा घाला. यात लसूण, हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घाला.

२) त्यात चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट घालून चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्या. यात थोडं पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्या.

मेंदूला नुकसान पोहोचवतात 'या' ५ सवयी; स्मरणशक्ती होते कमी-विसरायची सवय लागण्याआधीच सांभाळा

३) चपातीला एक उकळी आल्यानंतर त्यात चपात्या घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यात २ चमचे चण्याचे पीठ घालून पुन्हा एकजीव करा यावर कोथिंबीर घाला.

प्रेग्नंसीनंतर शरीर सुटलं-PCOD त्रास; महिलेनं ३ महिन्यात १५ किलो घटवलं, पाहा कसं

४) ५ ते १० मिनिटं शिजवून गॅस बंद करा. तयार आहेत चपातीचे कुटके. पापड आणि लोणच्याबरोबर तुम्ही चपातीचे कुटके खाऊ शकता. 

Web Title: How to Make Tasty Snacks From Stale Chapatis in 5 Minutes : Stale Chapati Snacks Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.