इडली, डोसा, उतप्पा असे पदार्थ नाश्त्याला असले की नाश्ता कसा चवदार, हलकाफुलका होतो. त्यामुळे बहुसंख्य लोकांना हे पदार्थ आवडतात. आता डाळ- तांदूळाची साधी इडली आपण नेहमीच खातो. त्याच चवीशी थोडा मिळताजुळता असणारा पण करायला आणि चवीला थोडा वेगळा दिसणारा थट्टे इडली हा प्रकार खाऊन पाहा. आपल्या नेहमीच्या इडलीपेक्षा ही इडली थोडी जाडसर आणि आकाराने मोठी असते. शिवाय ही इडली करण्याची पद्धतही थोडी वेगळी आहे. हा पदार्थ नाश्त्यासाठी अतिशय परफेक्ट आहे.
थट्टे इडली करण्याची रेसिपी
साहित्य
दिड कप तांदूळ
अर्धा कप उडीद डाळ
२ टेबलस्पून पोहे
१ टेबलस्पून साबुदाणा
१ टीस्पून मेथी दाणे
चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी डाळ, तांदूळ, साबुदाणा आणि पोहे हे सगळे पदार्थ स्वच्छ धुवून घ्या आणि ७ ते ८ तास भिजत घाला.
यानंतर डाळ, तांदूळ, साबुदाणा, पोहे आणि मेथी दाणे हे सगळं मिक्सरच्या भांड्यात एकत्र टाका आणि अगदी बारीक वाटून घ्या.
हेल्दी समजून खाता त्या पनीरमध्ये डिटर्जंट, युरिया तर नाही ना? पनीरमधली भेसळ ओळखण्यासाठी ४ टिप्स
यानंतर हे सगळं मिश्रण एका भांड्यात काढून घ्या आणि ७ ते ८ तासांसाठी फर्मेंट व्हायला ठेवा.
त्यानंतर थट्टे इडली करण्यासाठी बाजारात खास पात्र मिळतं. पण ते तुमच्याकडे नसेल तर आपल्या साध्या नेहमीच्या खोलगट डिश घेऊनही तुम्ही ही इडली करून पाहू शकता.
त्यासाठी एक कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्या कढईमध्ये एखादी वाटी किंवा फुलपात्र ठेवा. आता कढईमध्ये पाणी टाका. एक खोलगट आकाराची छोटी डिश घ्या आणि तिला आतून तूप लावून घ्या. आता या डिशमध्ये आपलं इडलीचं बॅटर टाका.
ही डिश कढईतल्या वाटीवर ठेवा. कढईवर झाकण ठेवून द्या. १० ते १२ मिनिटे गॅस मध्यम आचेवर ठेवावा. यानंतर झाकण उघडून एकदा इडली व्यवस्थित वाफावली गेली आहे की नाही, ते तपासून पाहा.
काय सांगता विद्या बालनकडे आहेत फक्त २५ साड्या? आणि त्या साड्याही अशा आहेत की....
इडली छान फुगून आली असेल तर गॅस बंद करा. इडली कच्ची आहे असं वाटलं तर पुन्हा २ ते ३ मिनिटे ती वाफवून घ्या. थट्टे इडली सर्व्ह करताना तिच्यावर थोडं तिखट आणि सांबार मसाला टाकून दिला जातो. ही इडली तुम्ही चटणी किंवा सांबारसोबत खाऊ शकता.