पावसाळ्यात अनेकदा आपल्याला मुसळदार कोसळणारा पाऊस बघत मस्त, गरमागरम, फक्कड चहा पिण्याची इच्छा अनेकदा होते. पावसाळ्यात गरमागरम कडक, मसालेदार चहा प्यायला सगळ्यांचं आवडत. मसाला चहाचं नाव काढलं की वेळ कोणतीही असो चहा प्यावासा वाटतोच. मसाला चहाचा सुंगध, त्याचा कडकपणा यामुळे जी तरतरी येते त्याला तोड नाही. चहा हा आरोग्याल घातक आहे असं म्हटलं जातं. पण तो केव्हा जेव्हा तो चुकीच्या पध्दतीने बनवला जातो आणि अति प्रमाणात प्यायला जातो तेव्हा. पण मसाला चहाची गोष्टच न्यारी. या चहात घातल्या जाणार्या मसाल्यांमुळे तरतरी येते, मूड फ्रेश होतो ,रोगप्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून संरक्षणही होतं.
आपल्याला रोजच्या जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले हे लागतातच. दिवसाची सुरुवात ज्या चहाने होते त्या चहासाठी चहा मसाला आणि फळं खाताना चाट मसाला हवा वरुन भुरभुरल्याशिवाय मजाच येत नाही. हे सगळे मसाले बाहेर विकत मिळत असले तरी किंमत जास्त आणि प्रमाण कमी अशी परिस्थिती असते. याचबरोबर तो मसाला स्वादाला तेवढा चांगला असेलच असे नाही. हेच मसाले बाहेरुन विकत आणण्यापेक्षा घरी केल्यास विकतच्या तुलनेत कमी पैशात जास्त मसाला तयार होतो आणि त्याची चवही छान लागते. हा चहाचा मसाला घरीच करताना खूप व्याप करावा लागत नाही. अवघ्या दहा बारा मिनिटात चहा मसाला तयार करता येतो. घरच्याघरी परफेक्ट चहा मसाला तयार करण्याची ही आहे सोपी कृती(How To Make The Perfect Desi Chai Masala In Just 10 Minutes At Home).
साहित्य :-
१. वेलची - १ कप (सालीसहित)
२. लवंग - १ कप
३. सुंठ - १ कप
४. दालचिनी - १० ते १२ काड्या
५. काळीमिरी - १ टेबलस्पून
६. जाडी काळी वेलची - ५ ते ६
७. ज्येष्ठमधाची पावडर - १ टेबलस्पून
८. तुळशीच्या पानांची पावडर - १ टेबलस्पून
९. बडीशेप - १ टेबलस्पून
१०. खडी साखर - २ टेबलस्पून
रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक... चपात्या होतील झटपट...
कृती :-
१. सर्वप्रथम गॅसच्या मंद आचेवर पॅन गरम करत ठेवावा.
२. पॅन हलकेच थोडा गरम झाल्यावर त्यात वेलची, लवंग, सुंठ, दालचिनी, काळीमिरी, जाडी काळी वेलची हे सर्व जिन्नस एकत्रित घालावेत.
३. आता हे सर्व जिन्नस एकत्रित करून किमान ४ ते ५ मिनिटे कोरडेच भाजून घ्यावेत.
४. त्यानंतर हे भाजून घेतलेले जिन्नस थोडे गार होण्यासाठी एका पसरट भांड्यात काढून घ्यावेत.
पावसाळ्यात मीठ व साखरेला ओलसरपणा येऊन गुठळ्या तयार होतात ? ६ सोप्या घरगुती टिप्स...
सुके खोबरे खवट होते, काळे पडते ? २ उपाय, खोबरे टिकेल भरपूर...
५. हे सर्व जिन्नस गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यावे.
६. आता मिक्सरच्या भांड्यात हे सर्व भाजून घेतलेले जिन्नस ओतल्यावर त्यात ज्येष्ठमधाची पावडर, तुळशीच्या पानांची पावडर, बडीशेप, खडी साखर घालावी.
७. हे सर्व जिन्नस एकत्रित मिक्सरमध्ये बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावेत.
साजूक तूप करण्यासाठी साय साठवण्याच्या ५ सोप्या टिप्स, तूप होईल शुभ्र- रवाळ...
कडक आणि मसालेदार चहाचा मसाला तयार आहे. आपण चहा बनवताना आपल्या आवडीनुसार हवा तेवढा मसाला घालून चहाची चव वाढवू शकता.