Join us  

घरात कोणतीच भाजी नसेल तर २ टोमॅटो घ्या, ५ मिनिटांत करा चमचमीत चटणी-बघा सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 12:40 PM

How To Make Tomato Chutney: एखाद्या वेळी घरात भाजी नसेल तर २ टोमॅटो घेऊन ही चटपटीत चटणी करा..(easy and simple recipe for tomato chutney)

ठळक मुद्देही चटणी नक्कीच सगळ्यांना एवढी आवडेल की बऱ्याचदा घरात इतर भाज्या असतानाही या रेसिपीने टोमॅटोची चटणी करा, अशी फर्माईश तुम्हाला घरच्या मंडळींकडून येईल.

भाज्या आणा, निवडून ठेवा हे घरातल्या महिलेचे रोजचे काम. प्रत्येक घरात दर दिवशी किमान दोन भाज्या तरी लागतातच. त्यामुळे त्या अंदाजाने आपण जास्तीच्या भाज्या घेऊन ठेवतोच. पण कधीतरी एखादा दिवस असाही येतो की काही कारणाने भाजी घेणं होत नाही आणि मग त्या दिवशी घरात कोणतीच भाजी नसते. अशावेळी फक्त २- ३ टोमॅटो आणि इतर काही पदार्थ घेऊन टोमॅटोची चटपटीत चटणी करून पाहा (how to make tomato chutney?). ही चटणी नक्कीच सगळ्यांना एवढी आवडेल की बऱ्याचदा घरात इतर भाज्या असतानाही या रेसिपीने टोमॅटोची चटणी करा (easy and simple recipe for tomato chutney), अशी फर्माईश तुम्हाला घरच्या मंडळींकडून येईल. (quick and instant recipe of tomato chutney)

टोमॅटो चटणी करण्याची रेसिपी

 

साहित्य

२ ते ३ मध्यम आकाराचे टोमॅटो

२ हिरव्या मिरच्या

लसूणाच्या ७ ते ८ पाकळ्या

ते दोघे भांडत आणि मी पायऱ्यांवर..! रणवीर कपूर सांगतो अजूनही कुणी आरडाओरडा केला तर मला...

१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा

१ चमचा बारीक चिरलेली कोथिंबर

अर्धा चमचा गूळ

फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता

चवीनुसार मीठ

 

कृती

सगळ्यात आधी टोमॅटो धुवून ते मधोमध कापा आणि त्याचे दोन किंवा चार भाग करा.

मिरच्यांना मधोमध उभा छेद द्या.

टॉकीजमध्ये सिनेमा पाहताना खाता तसे चटपटीत मसाला कॉर्न घरी करायचे? बघा सोपी रेसिपी

त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल टाका. तेल तापल्यानंतर टोमॅटोचे तुकडे, मिरच्या आणि लसूण कढईमध्ये टाका आणि झाकण ठेवून वाफ येऊ द्या. 

वाफ आल्यानंतर गॅस बंद करा. टोमॅटोची सालं काढून घ्या. यानंतर टोमॅटो थंड झाले की टोमॅटो, मिरची, आणि लसूण मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. त्याचवेळी त्यात थोडा गूळ टाका.

आता हे मिश्रण एका भांड्यात काढा. चवीनुसार मीठ घाला आणि जिरे, मोहरी, हिंग, कडिपत्ता टाकून खमंग फोडणी द्या. नंतर सगळ्यात शेवटी ताज्या ताज्या हिरव्यागार कोथिंबीरीची पेरणी केली की झाली तयार टोमॅटोची चटणी.

ही चटणी तुम्ही पोळी, पराठा, इडली, डोसा यासोबतही खाऊ शकता. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.टोमॅटोभाज्या