Join us

उन्हाळ्यात भूक कमी झाली तर करा कांदा-टोमॅटोची झणझणीत चटणी, चव अशी की भूक खवळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 15:05 IST

How to make tomato chutney : भारतीय खाद्यसंस्कृतीत चटण्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. तोंडी लावण्यासाठी चटणी असली की कितीही साधं जेवण असेल तरी की लोक पोटभर जेवतात. (How to make tomato chutney)

जेवणाला नेहमी त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. भात किंवा चपातीबरोबर काहीतरी नवीन खावंसं वाटलं तर तुम्ही टोमॅटोची चटणी ट्राय करू शकता ही चटणी बनवायाला अतिशय सोपी असते.  टोमॅटोची आंबट-गोड चटणी इडली, डोश्याबरोबरही खाल्ली जाते. भारतीय खाद्यसंस्कृतीत चटण्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. तोंडी लावण्यासाठी चटणी असली की कितीही साधं जेवण असेल तरी की लोक पोटभर जेवतात. (How to make tomato chutney)

टोमॅटोची चटणी बनवण्याचं साहित्य

तेल - 1.5 चमचे

लसूण पाकळ्या - ४ ते ५

चिरलेला कांदा - १ कप

टोमॅटो - 1.5 कप

धणे - 1 लहान घड

पुदीना - 3/4 कप

नारळ - 1/4 कप

मीठ - चवीनुसार

फोडणीसाठी - 

तीळाचे तेल - 1 टेस्पून

मोहरी - १/२ टीस्पून

जिरे - १/२ टीस्पून

कढीपत्ता - १० ते १२

लाल तिखट- २ चमचे

कृती

टोमॅटोची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात लसूण, टोमॅटो आणि कांद्याचे काप घाला. यात मीठ घालून साहित्य एकजीव करा आणि झाकण ठेवून द्या. झाकण काढल्यानंतर त्यात कोथिंबीर, पुदीन्याची पानं,  किसलेलं सुकं खोबर घालून मिश्रण एकजीव करून घ्या. 

१ वाफ काढल्यानंतर  हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्या.  एका  कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरं, कढीपत्ता, लाल मसाला घालून फोडणी तयार करा. यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मिश्रण घाला. त्यात भाजलेली मेथी पावडर घाला. इडली किंवा चपातीबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स