Join us  

१ टोमॅटो चिरुन ५ मिनिटांत करा कुरकुरीत टोमॅटो डोसा; पटकन होणारा नाश्ता-पाहा रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 8:49 AM

How To Make Tomato Dosa : टोमॅटोच्या आंबट चवीमुळे या डोश्यांची चव अधिकच उत्तम होते.

टोमॅटो डोसा (Tomato Dosa)  हा एक अनोखा साऊथ इंडियन पदार्थ आहे. हा डोसा टोमॅटो प्युरी किंवा उडीदाच्या डाळीसोबत मिसळून तयार केला जातो. ही एक उत्तम रेसेपी आहे. जी तुम्ही कधीही कुठेही बनवू शकता. टोमॅटोचा डोसा करायला अगदी सोपा आहे. यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागणार नाही. (Tomato Dosa Recipe How To Make Tomato Dosa)

ही डिश तयार करण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे तांदूळ, उडीदाची डाळ, टोमटो,  कोथिंबीर आणि रिफाईंड तेल ही एक परेफक्ट ब्रेकफास्ट रेसिपी आहे. टोमॅटोच्या आंबट चवीमुळे या डोश्यांची चव अधिकच उत्तम होते. हा क्रिस्पी डोसा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. (Tomato Dosa Recipe)

हा डोसा तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता. ही एक सोपी रेसिपी आहे. फक्त २० मिनिटांत तयार होते. सकाळच्याववेळी करण्यासाठी अगदी सोपी अशी रेसिपी आहे. स्वादीष्ट असण्याबरोबरच चवीलाही उत्तम असते.   हा डोसा बनवण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. पार्टी, गेम नाईट्स आणि छोट्या गेट टु गेदरमध्ये बनवू शकता. यामुळे कुकिंग स्किल्स चांगले डेव्हलप होतील

टोमॅटो डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य (Tomato Dosa Making Tips)

१) तांदूळ - ३ कप 

२) उडीद डाळ - अर्धा कप 

३) धणे - २ चमचे 

४) रिफाइंड तेल - ४ टेबलस्पून

५) चिरलेले टोमॅटो- ३ मोठे

६)  लाल मिरच्या - ३ ते ४

७) मीठ - चवीनुसार

८) पाणी - २ कप

टोमॅटो डोसा करण्याची कृती (How To Make Tomato Dosa)

१) टोमॅटो डोसा करण्यासाठी दोन वाट्या पाणी घेऊन तांदूळ आणि डाळ  ३-४ तास भिजत ठेवा. डाळ, तांदूळ आणि धणे एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो, लाल मिरची घालून पुन्हा बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवा.

घरात झुरळं-मुग्यांनी उच्छाद मांडलाय? लादी पुसताना पाण्यात १ पदार्थ मिसळा, उपद्रव होईल कमी

२) एका मोठ्या भांड्यात पीठ काढा आणि चवीनुसार मीठ घाला. 30-45 मिनिटे बाजूला ठेवा.मध्यम आचेवर तवा गरम करा. एक चमचा पीठ घाला आणि चमच्याच्या मदतीने बाहेर पसरवा.

पोट लटकतंय-दंड जाड दिसतात? डॉक्टर सांगतात ८०-१०-१० चा खास फॉम्यूला, झरझर घटेल चरबी

३)  कडांना तेल लावा, उलटा करा आणि दोन्ही बाजूंनी शिजवा. पूर्ण झाल्यावर सर्व्हिंग प्लेटमध्ये ठेवा आणि नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स