स्वयंपाकात भाजी, डाळ किंवा चटणी करताना टोमॅटोचा वापर केला जातो. भाजीत टोमॅटो घातल्याशिवाय स्वयंपाक पूर्णच होत नाही असं अनेकदा दिसून येतं. (Tomato Papad Recipe) पदार्थांला आंबट गोड चव येण्यासह टोमॅटोच्या सेवनाचे तब्येतीलाही अनेक फायदे मिळतात. टोमॅटोचे पापडही उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर बनवले जातात.(Rice flour Tomato Papad Recipe) विशेष म्हणजे हे पापड बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि वर्षानुवर्ष ते टिकून राहतात. मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी किंवा जेवताना ताटाला लावण्यासाठी उत्तम पर्याय आहे. (How to make tomato papad)
टोमॅटोचे पापड बनवण्याचं साहित्य
1 कप तांदूळ
4 लाल टोमॅटो
1 टीस्पून ठेचलेली लाल मिरची
1 टीस्पून जिरे
5 कप पाणी
अर्धा चमचा बेकिंग सोडा
चवीनुसार मीठ
पापड तळण्यासाठी तेल
कृती
१) टोमॅटोचे पापड बनवण्यासाठी एक कप तांदूळ रात्रभर भिजत ठेवा. आता भिजवलेल्या तांदळाचे पाणी काढून त्यात थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि एका मोठ्या भांड्यात काढा.
२) टोमॅटोचे मोठे तुकडे करून त्याच भांड्यात टाका आणि टोमॅटोची बारीक पेस्ट तयार करा. आता टोमॅटोची पेस्ट चाळणीने गाळून घ्या.
फक्त १ कांदा कापून करा खमंग, क्रिस्पी कांदा वडे; सोपी रेसिपी, नाश्त्यासाठी खायला झटपट पदार्थ
३) तांदळाच्या पेस्टमध्ये टोमॅटोची पेस्ट चांगली मिसळा. आता त्यात एक टीस्पून जिरे, ठेचलेली लाल मिरची, हिंग, सोडा आणि चवीनुसार मीठ घालून सर्वकाही चांगले मिसळा.
४) त्यात 5 कप पाणी घालून द्रावण थोडे पातळ करा, 1 कप तांदूळासाठी 5 कप पाणी वापरा. आता ते मिश्रण गॅसवर ठेवून, सतत ढवळत असताना मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
५) एका प्लास्टिकच्या कागदाला तेल लावा, आता पॉलिथिनवर १-१ चमचा मिश्रण घाला आणि चमच्याने गोलाकार हालचालीत मिश्रण पसरवा. १ ते २ दिवसात पापड व्यवस्थित सुकतील. नंतर हे पापड तळायला तयार असतील.