Lokmat Sakhi >Food > टोमॅटोची पावडर करून ठेवा, आणि वर्षभर भाजी - आमटीला वापरा, पाहा कशी करायची पावडर...

टोमॅटोची पावडर करून ठेवा, आणि वर्षभर भाजी - आमटीला वापरा, पाहा कशी करायची पावडर...

How To Make Tomato Powder At Home : टोमॅटो पावडर तयार करून टोमॅटो कापायची झंझटच विसरा... टोमॅटो पावडर वापरून झटपट होईल स्वयंपाक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2023 05:47 PM2023-01-31T17:47:19+5:302023-01-31T18:18:32+5:30

How To Make Tomato Powder At Home : टोमॅटो पावडर तयार करून टोमॅटो कापायची झंझटच विसरा... टोमॅटो पावडर वापरून झटपट होईल स्वयंपाक...

How To Make Tomato Powder At Home.... | टोमॅटोची पावडर करून ठेवा, आणि वर्षभर भाजी - आमटीला वापरा, पाहा कशी करायची पावडर...

टोमॅटोची पावडर करून ठेवा, आणि वर्षभर भाजी - आमटीला वापरा, पाहा कशी करायची पावडर...

स्वयंपाक घरामधील कुठलीही भाजी अथवा रेसिपी करायचे असेल तर टोमॅटोची गरज भासतेच. त्यामुळे टॉमॅटोला स्वयंपाक घरातील बादशहा असे म्हटले जाते. कुठल्याही प्रकारची भाजी, डाळ करायचे म्हटले की सर्वात आधी टोमॅटोची आवश्यकता लागतेच. टोमॅटो हे दिसायला सुंदर खाण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक असतात. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि कॅल्शियम असते. त्यामुळे टोमॅटो आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या किचनमध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो कायम उपलब्ध असतातच. तसे कांदा, बटाटा, टोमॅटो वर्षाचे बाराही महिने बाजारांत विकत मिळतात. 

कधी बाजारांत टोमॅटोची आवक जास्त झाल्यावर त्याचा दर पडून टोमॅटो अतिशय स्वस्त किमतीत उपलब्ध होतात. अशावेळी गृहिणी जास्तीचे टोमॅटो विकत घेऊन ते फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतात. परंतु हे जास्तीचे टोमॅटो खरेदी केल्यानंतर काही कालांतराने फ्रिजमध्ये ठेवून खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी टोमॅटोची पावडर करून ती स्टोअर करता आली तर जास्तीचे टोमॅटो खराब होणार नाही सोबतच रोज टोमॅटो कापायची चिंताच दूर होऊन झटपट स्वयंपाक होईल(How To Make Tomato Powder At Home).

टोमॅटो स्टोअर करण्यापेक्षा टोमॅटोची पावडर वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवा... 
आंबट - गोड व चविष्ट टोमॅटो सलॅड म्हणून खाता येतो, दह्याबरोबर कोशिंबीरीत टाकता येते, अनेक भाज्यात, खिचडीत, सुजीत, उपम्यात वापरता येतो. घरात भाजी उपलब्ध नसेल तर झटपट टोमॅटोची चटणी बनवून काम होऊ शकते. आजकाल बाजारांत सगळ्या पदार्थांच्या रेडिमेड पावडर मिळतात. परंतु या विकतच्या महागड्या आणि प्रिझर्व्हेटिव्ह घातलेल्या पावडर खरेदी करण्यापेक्षा झटपट घरच्या घरी किफायतशीर किंमतीमध्ये आपण टोमॅटोची पावडर बनवून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. 

seemassmartkitchen या इंस्टग्राम पेजवरून टोमॅटोपासून टोमॅटोची पावडर कशी तयार करायची याची कृती समजावून सांगितली आहे. 

कृती :-   

१. बाजारातून विकत आणलेले टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. 
२. यानंतर हे टोमॅटो व्यवस्थित वाळवून देटाकडचा भाग काढून घ्यावा. 
३. आता या टोमॅटोचे लांब, पातळसर काप करून घ्यावेत. 
४. हे काप एका मोठ्या थाळीमध्ये पसरवून ठेवावे. 
५. हे काप थाळीत पसरवून झाल्यानंतर त्यावर कॉटनचा कपडा बांधावा. 

६. आता ही थाळी पुढील ३ ते ४ दिवस उन्हात वाळवून घ्या. या टोमॅटोच्या चकत्यांमधील पाण्याचा अंश संपूर्ण निघून जाईपर्यंत चकत्या व्यवस्थित वाळून घ्या. 
७. वाळल्यानंतर या सुकलेल्या चकत्या मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पूड करून घ्यावी. 
८. ही टोमॅटोची पावडर एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा. टोमॅटोची पावडर वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवा. 

टोमॅटोची पावडर तयार आहे. डाळ, भाजी किंवा टोमॅटोचे सूप तयार करण्यासाठी या पावडरचा वापर करता येऊ शकतो.

 

Web Title: How To Make Tomato Powder At Home....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.