रोजचा स्वयंपाक बनवताना भाजी, आमटी, डाळ यात टोमॅटो हा लागतोच. टोमॅटो हा तसा रोजच्या जेवणात वापरला जाणारा मुख्य पदार्थ आहे. लालचुटुक टोमॅटो हे दिसायला सुंदर आणि खायला चविष्ट लागतात. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि कॅल्शियम असते. त्यामुळे टोमॅटो (Store Tomato For a Year) आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरतात. आपल्या किचनमध्ये टोमॅटो, बटाटे कायम उपलब्ध असतात. त्याचबरोबर कांदा, बटाटा, टोमॅटो हे वर्षाचे बाराही महिने बाजारांत विकत देखील मिळतात(Homemade Tomato Powder Recipe).
कोणताही पदार्थ बनवताना त्यात टोमॅटो हा लागतोच. त्यामुळे रोज टोमॅटो चिरावा देखील लागतो. परंतु काहीवेळा सकाळच्या कामाच्या गडबडीत आपल्याकडे टोमॅटो चिरायला वेळ नसतो. अशावेळी आपण स्टोर करुन ठेवलेली टोमॅटोची पावडर (MAKE HOMEMADE TOMATO POWDER) वापरु शकतो. त्याचबरोबर काहीवेळा आपण एकाच वेळी भरपूर टोमॅटो (Dried Tomatoes) खरेदी करतो, पण ते दीर्घकाळ टिकत नाही तर लगेच खराब होतात. अशावेळी टोमॅटोची पावडर करुन ती स्टोर करता आली तर जास्तीचे टोमॅटो खराब होणार नाहीत. यासोबतच रोज टोमॅटो कापायची चिंता दूर होऊन झटपट स्वयंपाक होईल(How To Make Tomato Powder At Home).
टोमॅटोची पावडर कशी करायची ?
१. बाजारातून विकत आणलेले टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
२. यानंतर हे टोमॅटो व्यवस्थित वाळवून देटाकडचा भाग काढून घ्यावा.
३. आता या टोमॅटोचे लांब, पातळसर काप करुन घ्यावेत.
४. हे काप एका मोठ्या थाळीमध्ये पसरवून ठेवावे.
कोकणात करतात तशी अस्सल पारंपरिक कुळथाची पिठी करा, पावसाळ्यात जेवणाचा बेत जमेल झक्कास !
ना स्टफिंग, ना कणिक मळायची झंझट तरीही झटपट बनवा चविष्ट पनीर पराठा.... गरमागरम पराठा खायला तयार...
५. हे काप थाळीत पसरवून झाल्यानंतर त्यावर कॉटनचा कपडा बांधवा.
६. आता ही थाळी पुढील ३ ते ४ दिवस उन्हात वाळवून घ्या. या टोमॅटोच्या चकत्यांमधील पाण्याचा अंश संपूर्ण निघून जाईपर्यंत चकत्या व्यवस्थित वाळवून घ्या.
७. वाळवल्यानंतर या सुकलेल्या चकत्यामिक्सरमध्ये बारीक करून त्याची पूड करुन घ्यावी.
८. हो टोमॅटोची पावडर एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा.
अशाप्रकारे आपण ही टोमॅटोची पावडर वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. डाळ, भाजी, आमटी किंवा टोमॅटोचे सूप तयार करण्यासाठी आपण या पावडरचा वापर करु शकतो.