हिवाळा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. त्यामुळे थंडीचा मौसम संपण्याच्या आधी एकदा गरमागरम टोमॅटो सार तुमच्या रात्रीच्या जेवणात करून बघाच. तसं तर टोमॅटो सार आपण तिन्ही ऋतूमध्ये पिऊ शकतो. पण हिवाळ्यात सगळीकडे थंडगार वातावरण असताना गरमागरम टोमॅटो सार पिण्याची मजा तर काही वेगळीच आहे (easy and simple method of tomato sar). त्यामुळे टोमॅटो सार करण्याची ही सोपी रेसिपी लगेचच बघा आणि चटकदार टोमॅटो सार करून प्या..(tomato saar recipe in Marathi) टोमॅटो सार करण्याची रेसिपी
साहित्य
४ ते ५ मध्यम आकाराचे टोमॅटो
१ टेबलस्पून चिंचेचा कोळ
७ ते ८ लसूण पाकळ्या
अंग आखडून गेलं? ६ व्यायाम करा, शरीर होईल लवचिक आणि वजनही झरझर उतरेल..
२ हिरव्या मिरच्या
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे आणि हिंग
चवीनुसार मीठ, लाल तिखट
१ टीस्पून जिरेपूड
कृती
सगळ्यात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. टोमॅटो सार करण्यासाठी नेहमी लालबुंद रंगाचे, पिकलेले टोमॅटो घ्यावेत. टोमॅटोचा देठाकडचा भाग काढून टाका आणि त्यावर दोन उभे काप द्या.
आता कुकरचा डबा घ्या. त्यात टोमॅटो ठेवा आणि त्यामध्ये टोमॅटो भिजतील एवढे पाणी घाला. मध्यम आचेवर एक शिट्टी होईपर्यंत शिजवा.
तुमच्या शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता आहे असं सांगणारी ५ प्रमुख लक्षणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष नकोच...
टोमॅटो थंड झाले की त्याचे साल काढून घ्या. त्यानंतर उकडेलेले टोमॅटो मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या. यावेळी त्यात पाणी घालू नका.
त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यानंतर तेल, मोहरी, जिरे आणि हिंग घालून फोडणी करून घ्या. त्यानंतर मिरच्या आणि लसूण पेस्ट, कडीपत्ता घालून परतून घ्या.
त्यानंतर टोमॅटोची प्युरी घाला आणि व्यवस्थित परतून घ्या. टोमॅटोची प्युरी एखादा मिनिट परतून झाल्यानंतर त्यात पाणी घाला. नंतर त्यात १ टेबलस्पून एवढा चिंचेचा कोळ आणि गूळ घाला.
जेवणानंतर चिमूटभर तरी बडीशेप खायलाच पाहिजे, कारण.... पोटाचे डॉक्टर सांगतात ४ जबरदस्त फायदे
चवीनुसार लाल तिखट, जिरेपूड आणि मीठ घाला आणि मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्या.
उकळी आल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि पुन्हा १ ते २ मिनिटे उकळू द्या. टाेमॅटोचं चटपटीत सार झाला तयार..