सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आता आगमन होणार आहे. बाप्पाच्या येण्यासाठी आता फारच कमी दिवस राहिले आहेत. बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. मोदक हा गोड पदार्थ अतिशय लोकप्रिय आहे. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी विशेषतः उकडीचे मोदक (Ukadiche Modak) केले जातात. गणेशोत्सवादरम्यान प्रत्येकाच्याच घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार केले जातात. आता मिठाईच्या दुकानांमध्येही कित्येक प्रकारचे मोदक उपलब्ध असतात. पण या मोदकांऐवजी घरामध्ये केलेले उकडीचे मोदक हेच सर्वांच्या खास पसंतीचे असतात(Traditional Steamed Modak Recipe, Ukadiche modak - Ganesh Chaturthi Special).
उकडीचे मोदक बनवायचे म्हणजे त्याचा खूप मोठा घाट घालावा लागतो. मोदकांसाठी उकड काढा, सारण बनवा, मोदकाच्या काळया बनवा अशा अनेक खटपटी कराव्या लागतात. सगळ्यांनाच हे उकडीचे मोदक जमतातच असे नाही. उकडीचे मोदक (How to make modak?) करताना तांदळाच्या पिठाचे प्रमाण आणि उकड कशी काढायची हे गणित अत्यंत महत्त्वाचे आहे. ते एकदा जमले की आपल्याला फक्कड उकडीचे मोदक (Modak Recipe Tips & Tricks) करता येतील. मोदकाचा आकार व कळ्या बनवणे ही देखील एक कलाकृतीच आहे. त्यामुळे त्याचा जितका सराव केला जाईल तितका चांगला मोदक बनवता येतो. उकडीचे मोदक करताना ते फाटू नयेत तसेच त्यांची चवही अगदी छान जमावी, यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवूयात(How To Make Traditional Ukadiche Modak Recipe At Home).
उकडीचे मोदक तयार करताना लक्षांत ठेवा...
१. उकडीचे मोदक करण्यासाठी आंबेमोहोर तांदूळ वापरावा, यामुळे मोदकाच्या पारीचे पीठ चिकट होत नाही.
२. हळदीच्या पानात मोदक उकडवल्यास, त्याची चव छान लागते.
३. मोदकपात्र किमान पाच मिनिटे आधी पाणी ठेऊन गॅसवर गरम करत ठेवावे.
गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...
४. मोदकपात्रात चाळण ठेऊन त्यामध्ये केळीचे पान घालावे त्यावर तेल लावा आणि मगच मोदक आत ठेवा. असे केल्याने मोदक चिकटत नाहीत आणि केळीच्या पानाचा स्वादही त्याला सुंदर येतो.
५. मोदकपात्रात मोदक ठेवतात गर्दी करून मोदक ठेऊ नका. सुटसुटीत ठेवा जेणेकरून तांदळाची काढलेली उकड व्यवस्थित शिजेल आणि खाताना घशाला चिकटणार नाही.
६. मोदकाचे सारण तयार करताना त्यात थोडासा खवा घातल्यास, सारणाचा स्वाद अधिक चांगला लागतो.
श्रावण स्पेशल : उपवासाची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का ? मऊसूत गोड उपवास पुरणपोळीची सोपी रेसिपी...
ना उकड घ्यायचं टेंशन, ना सारणाची - ना तळणाची घाई ! गॅसही न पेटवता करता झटपट मोदक...
७. मोदक उकडण्याकरता चाळणीत ठेवताना, पाण्याचा हात लावून ठेवावेत म्हणजे फुटत नाही.
८. मोदकाची उकड करताना त्यात चिमूटभर पिठीसाखर घातल्यास मोदकांना चकाकी येते.
९. मोदकाची पारी मधोमध किंचित जाडसर व कडेला पातळ असावी, म्हणजे मोदक वाफवताना फुटत नाहीत आणि कळ्या सुबक आकाराच्या येतात.
१०. मोदकाची उकड गरम असतानाच वाटीच्या किंवा फुलपात्राच्या सपाट पृष्ठभागाला तेल लावून व्यवस्थित मळून घ्यावी. कोणत्याही गाठी राहायला नको. उकड ही कायम लोण्यासारखी मऊ असावी.