Lokmat Sakhi >Food > आंबट-गोड कच्च्या करवंदाचं लोणचं, आजीच्या हातची चव हवी तर लक्षात ठेवा ३ टिप्स

आंबट-गोड कच्च्या करवंदाचं लोणचं, आजीच्या हातची चव हवी तर लक्षात ठेवा ३ टिप्स

Traditional Karvand pickle recipe: Karwandache Lonche for summer: How to make Karvand pickle at home: Indian cranberry pickle recipe: Spicy Karwand pickle preparation: Benefits of Karwand in summer: Karwand pickle for digestion: करवंदाचे लोणचे कसे बनवायचे पाहूया त्याची सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2025 17:05 IST2025-03-27T17:00:00+5:302025-03-27T17:05:01+5:30

Traditional Karvand pickle recipe: Karwandache Lonche for summer: How to make Karvand pickle at home: Indian cranberry pickle recipe: Spicy Karwand pickle preparation: Benefits of Karwand in summer: Karwand pickle for digestion: करवंदाचे लोणचे कसे बनवायचे पाहूया त्याची सोपी रेसिपी.

how to make traditional way Karvand pickle karwandache lonche summer season recipe follow this simple tips | आंबट-गोड कच्च्या करवंदाचं लोणचं, आजीच्या हातची चव हवी तर लक्षात ठेवा ३ टिप्स

आंबट-गोड कच्च्या करवंदाचं लोणचं, आजीच्या हातची चव हवी तर लक्षात ठेवा ३ टिप्स

उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला सर्वत्र रानमेवा पाहायला मिळतो. चिंच, बोर, करवंद, तुती, कैरी, आवळा, आबोळी, जाम यांसारखी नैसर्गिक फळे जिभेला चव आणि गारवा देतात.(Traditional Karvand pickle recipe) वसंत आणि ग्रीष्म ऋतूपर्यंत याची चव हमखास चाखता येते. पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी चविष्ट, आंबट-गोड ही फळे असतात. शाळेच्या बाहेर, चौकात किंवा गल्लीच्या बाहेर हा रानमेवा पाहायला मिळायचा. (Karwandache Lonche for summer) त्यावर मस्त मीठ-मसाला खाऊ मुलांसह आपणही उत्साहात खायचो. परंतु, या रानमेवाची चव आपल्याला वर्षभर चाखायची असेल तर त्याचे लोणचं बनवू शकतो. (How to make Karvand pickle at home)

करवंद अनेकांना खायला आवडते. त्याच्या चवीमुळे जिभेवर अगदी रेंगाळत असते.(Spicy Karwand pickle preparation) परंतु ही चव आपल्याला दोन ते तीन महिनेच चाखता येते. आपण जर याचे वर्षभर टिकणारे लोणचे बनवले तर कधीही खाऊ शकतो.(Benefits of Karwand in summer) उन्हाळा सुरु झाला की, आई-आज्जी वाळवणाचे पदार्थ, मसाले आणि लोणचे बनवतात. अशातच आपण करवंदाचे लोणचे बनवले तर याची चव वर्षभर चाखू शकतो. करवंदाचे लोणचे कसे बनवायचे पाहूया त्याची सोपी रेसिपी. 

गुढीपाडवा : घरीच चक्का लावून ताजं-घट्ट स्वादिष्ट आम्रखंड करण्यासाठी ३ टिप्स, अस्सल मराठी चवीचं श्रीखंड

साहित्य 

कच्ची करवंद - १ मोठा कप 
मीठ - अर्धी वाटी
लोणचे मसाला - अर्धी वाटी 
 तेल - आवश्यकतेनुसार 

">

कृती 

1. सगळ्यात आधी करवंद मीठाच्या पाण्याने धुवून घ्या. आता हे करवंद दिवसभर उन्हात वाळवत ठेवा. ज्यामुळे त्याचा डिंक निघून जाण्यास मदत होईल. 

2. आता सुकवलेल्या करवंदाना मध्यभागी चिरुन घ्या. आता त्यात मीठ आणि लोणचे घाला. मिश्रण चांगले एकजीव करा. 

3. तयार करंवद दोन दिवस हवाबंद बाटलीत भरा, ज्यामुळे मसाला चांगला जिरेल. 

4. दोन दिवसानंतर त्यात गरम करुन थंड केलेले तेल घाला. सात दिवस लोणचे मुरत ठेवा. 

5. वर्षभर टिकेल असं आंबट-गोड करवंदाचे लोणचे तयार...
 

Web Title: how to make traditional way Karvand pickle karwandache lonche summer season recipe follow this simple tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.