Join us  

हळदीच्या दुधात 'हे' २ पदार्थ घाला, मिळतील भरपूर फायदे- बघा हळदीचं दूध करण्याची योग्य पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2023 11:04 AM

How to make turmeric milk?: हळदीचं दूध जर योग्य पद्धतीने केलं तरच त्याचा आरोग्याला लाभ होतो. म्हणूनच हळदीचं दूध (golden milk) करण्याची ही योग्य पद्धत एकदा पाहून घ्या..( haldicha dudh recipe in Marathi)

ठळक मुद्देहळदीचे दूध करताना त्यात कोणते २ पदार्थ टाकावे आणि दूध कशा पद्धतीने करावे, ते पाहा...

थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे या दिवसांत बहुतांश घरांमध्ये सर्दी- खोकला- कफ अशा आजारांनी त्रस्त असलेले लोक आहेत. त्यामुळेच या दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि सर्दी- खोकला- कफ असा त्रास कमी करण्यासाठी हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो (haldicha dudh recipe in Marathi). पण हळदीचं दूध पिण्याचे फायदे तेव्हाच मिळतील, जेव्हा ते दूध योग्य पद्धतीने तसेच आरोग्यासाठी पोषक ठरणारे पदार्थ टाकून केलं जाईल (How to make turmeric milk?). म्हणूनच हळदीचे दूध करताना त्यात कोणते २ पदार्थ टाकावे आणि दूध कशा पद्धतीने करावे, ते पाहा...(don't forget to add 2 important ingredients while making haldi ka dudh)

 

हळदीचं दूध करण्याची सर्वसामान्य पद्धत

पातेल्यात दूध तापायला ठेवायचं. त्यात हळद घालून ते उकळायचं. नंतर ते दूध कपात ओतून घ्यायचं आणि वरून त्यात गूळ टाकायचा.... अशा पद्धतीने बहुतांश घरांमध्ये हळदीचं दूध केलं जातं.

२०२३ चा व्हायरल फूड ट्रेण्ड- कांद्याच्या टरफलांची पावडर! बघा कशी करायची- काय त्याचे फायदे?

पण थंडीच्या दिवसांत जर हे दूध आरोग्यासाठी अधिक पोषक बनवायचं असेल तर त्या दुधामध्ये तूप आणि मीरेपूड हे दोन पदार्थही घालायला पाहिजेत. हे २ पदार्थ घालून केलेलं हळदीचं दूध रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तर पोषक ठरतंच पण तुपामुळे हिवाळ्यातली सांधेदुखी कमी होण्यास मदत होते शिवाय पचनाचे त्रासही कमी होतात. म्हणूनच हळदीचं दूध करण्याची ही रेसिपी आता बघा..

 

हळदीचं दूध करण्याची परफेक्ट रेसिपी

या पद्धतीनुसार हळदीचं दूध करण्यासाठी आपल्याला २ टीस्पून तूप, १ टीस्पून हळद, चिमूटभर मीरेपूड, १ कप दूध आणि १ किंवा अर्धा टीस्पून गूळ लागणार आहे.

डिशवॉशर घ्यायचंय? बघा कमी जागेत मावणारे, वापरायला सोपे असे ३ पर्याय- काम होईल झटपट

सगळ्यात आधी तर एका पातेल्यात दूध गरम करायला ठेवा. दुसरीकडे फोडणीची लहानशी कढई गॅसवर तापायला ठेवा. त्या कढईमध्ये तूप टाका. तूप गरम झाले की त्यात हळद आणि मीरेपूड टाका. 

आता हे तुप- हळदीचे मिश्रण दुधात टाका. दूध चांगले हलवून घ्या आणि कपात ओता. आता त्यात गूळ टाका आणि हे दूध रात्री झोपण्यापुर्वी प्या.

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजी